मुंबई, 29 सप्टेंबर : इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) स्पर्धेतील 42 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्जचा (Mumbai Indians vs Punjab Kings) पराभव केला आहे. गेल्या 3 मॅचमधील सलग पराभवानंतर मुंबईनं अबु धाबीमध्ये ही साखळी तोडली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमनं पंजाबचा (PBKS) 6 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सनं (MI) 136 रनचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईच्या या विजयानंतर पॉईंट्स टेबलमधील (IPL 2021, Points Table) रंगत आणखी वाढली आहे.
आयपीएलमधील ताज्या पॉईंट्स टेबलनुसार मुंबई इंडियन्सनं 11 मॅचमध्ये 5 विजयासह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर पंजाबची टीम 11 मॅचमध्ये 7 पराभवासह सहाव्या नंबरवर आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) देखील 11 मॅचमध्ये 5 विजय मिळवले आहेत. पण, रनरेटच्या आधारावर ही टीम चौथ्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) 10 मॅचमध्ये 8 विजयासह टॉपवर आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) 11 मॅचमध्ये 8 विजयासह दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) 10 मॅचमध्ये 6 विजयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दिल्लीच्या पराभवामुळे मुंबईला फटका
मंगळवारी झालेल्या आयपीएलमधील 41 व्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सनं पराभव केला. दिल्लीच्या पराभवाचा मुंबईला फटका बसला आहे. या मॅचमध्ये दिल्लीची टीम विजयी झाली असती तर मुंबई इंडियन्स पंजाबला पराभूत करत टॉप 4 मध्ये दाखल झाली असती, पण मॉर्गनच्या टीमनं जबरदस्त कामगिरी करत असं होऊ दिलं नाही.
MI vs PBKS : मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय, हार्दिकची तडाखेबाज खेळी
कोलकातानं 128 रनचं लक्ष्य 18.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. बुधवारी आयपीएलमध्ये होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) या मॅचकडं मुंबईचं लक्ष असेल. या मॅचमध्ये राजस्थाननं विजय मिळवल्यास ती टीम पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहचेल, जिथं सध्या मुंबई इंडियन्स आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians, Punjab kings