• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, MI vs DC : मुंबई इंडियन्सबाबत सेहवागचं मत वाचून रोहित शर्मा होईल नाराज!!

IPL 2021, MI vs DC : मुंबई इंडियन्सबाबत सेहवागचं मत वाचून रोहित शर्मा होईल नाराज!!

मुंबई इंडियन्सची शनिवारी दिल्ली कॅपिटल्सशी (MI vs DC) होणार आहे. दिल्ली विरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. यापुढील प्रत्येक मॅचला 'प्ले ऑफ' साठी महत्त्व आहे. आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन टीम प्ले ऑफ (IPL Playoff) साठी पात्र झाल्या आहेत. उर्वरित दोन जागांसाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR), मुंबई इंडियन्स (MI), पंजाब किंग्ज (PBKS) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या चार टीममध्ये चुरस आहे. पंजाब किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सवर (PBKS vs KKR) विजय मिळवल्यानं मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मार्ग सोपा झाला आहे. आता मुंबईची लढत आज (शनिवारी) दिल्ली कॅपिटल्सशी (MI vs DC) होणार आहे. दिल्ली विरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते वाचून मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीमचे सर्व फॅन्स नाराज होणार आहेत. आयपीएल स्पर्धा पाच वेळा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं यंदा 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करु नये, असं मत सेहवागनं व्यक्त केलं आहे. 'क्रिकबझ' वरील कार्यक्रमात तो बोलत होता. 'मुंबई आयपीएलमधील सर्वोत्तम टीम आहे. या टीमला पुनरागमन कसं करायचं हे माहिती आहे. 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सला सर्व मॅच जिंकणे आवश्यक आहे. पण या लढती इतक्या सोप्या नसतील. IPL 2021, Points Table : पंजाबच्या विजयानं मुंबईला दिलासा, पाहा कशी आहे Play off ची संधी मुंबईचा इतिहास पाहिला तर ही टीम जेव्हा 'करो वा मरो' या परिस्थितीमध्ये अडकते तेव्हा मॅच नक्की जिंकते. तसंच 'प्ले ऑफ' साठी क्वालिफाय देखील करते. पण, माझा इतिहासावर विश्वास नाही. हे नेहमी होऊ शकत नाही.' असं सेहवागनं स्पष्ट केलं. यावेळी मुंबई इंडियन्स नाही तर दिल्ली, बंगळुरू किंवा पंजाब या टीमनं विजेतेपद पटकावं अशी अपेक्षा सेहवागनं यावेळी व्यक्त केली.
  Published by:News18 Desk
  First published: