या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले राजस्थानला बॅटिंगला बोलावलं. यानंतर एव्हिन लुईस (Evin Lewis) आणि यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) ओपनिंग जोडीने राजस्थानला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोघांनी 8.2 ओव्हरमध्येच 77 रन केले, पण त्यानंतर राजस्थानची बॅटिंग गडगडली. लुईस 37 बॉलमध्ये 58 रन करून आऊट झाला, तर यशस्वी जयस्वालला 22 बॉलमध्ये 21 रन करता आले. बँगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहल आणि शाहबाज अहमदला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. डॅनियल ख्रिश्चन आणि जॉर्ज गार्टोन यानेही 1-1 विकेट घेतली. IPL 2021 Points Table: विराटनं केली रोहितची मदत, बंगळुरूच्या विजयानं मुंबईचा मार्ग सोपा राजस्थानने ठेवलेल्या 150 रनच्या आव्हानाचा पाठलाग बँगलोरने 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून केला. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 30 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. तर श्रीकर भरत (S Bharat) 35 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला.In last one year, Riyan Parag got Signed autograph from his idol Virat Kohli trice on the bat. pic.twitter.com/zk7BqDYeIx
— CricketMAN2 (@man4_cricket) September 29, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, Virat kohli