मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : इंग्लंडचा जेम्स अँडरसन CSK कडून खेळणार! 'त्या' पोस्टनंतर फॅन्समध्ये चर्चा

IPL 2021 : इंग्लंडचा जेम्स अँडरसन CSK कडून खेळणार! 'त्या' पोस्टनंतर फॅन्समध्ये चर्चा

इंग्लंडकडून सर्वात जास्त टेस्ट विकेट्स घेणारा बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून आयपीएल खेळणार अशी फॅन्समध्ये चर्चा आहे.

इंग्लंडकडून सर्वात जास्त टेस्ट विकेट्स घेणारा बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून आयपीएल खेळणार अशी फॅन्समध्ये चर्चा आहे.

इंग्लंडकडून सर्वात जास्त टेस्ट विकेट्स घेणारा बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून आयपीएल खेळणार अशी फॅन्समध्ये चर्चा आहे.

मुंबई, 7 जुलै: कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेले आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) उर्वरित सामने आता यूएईमध्ये होणार आहेत.  या सामन्यांना सप्टेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. त्या काळातील व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक क्रिकेटपटू उर्वरित आयपीएलमधून माघार घेणार आहेत. त्यामुळे टीमना पर्यायी खेळाडूंची निवड करावी लागेल. आगामी टी20 वर्ल्ड कप लक्षात घेता इंग्लंडच्या टीममधील खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळू न देण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) घेतला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सला (CSK) याचा मोठा फटका बसणार आहे. चेन्नईतचे मोईन अली आणि सॅम करन हे दोन  खेळाडू उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत. त्यांना पर्याय म्हणून इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) याचा समावेश करावा अशी मागणी सीएसकेच्या फॅन्सनी केली आहे. सीएसकेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन  करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली आहे.

का सुरु झाली चर्चा?

जेम्स अँडरसनने  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार विकेट पूर्ण करत इतिहास घडवला आहे. लँकशायरकडून खेळताना केंटविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम केला. या महिन्याच्या शेवटी अँडरसन त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अँडरसनने केंटच्या हीनो कुन्हची विकेट घेऊन एक हजार विकेटचा टप्पा गाठला. या विक्रमाबद्दल सीएसकेनं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन अँडरसनचं अभिनंदन केलं आहे.

सीएसकेनं अँडरसनचं अभिनंदन करताच तो लवकरच टीमकडून खेळणार असल्याची चर्चा फॅन्समध्ये सुरु झाली आहे.

IND vs ENG: आर. अश्विन टेस्ट सीरिजपूर्वी घेणार मोठा निर्णय!

अँडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून खेळताना 162 मॅचमध्ये 26.67 च्या सरासरीने 617 विकेट घेतल्या. भारताविरुद्ध पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी (India vs England) अंडरसन तयारी करत आहे. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल.

First published:

Tags: Csk, IPL 2021, James anderson