मुंबई, 7 जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड
(India vs England) यांच्यातील पाच टेस्टची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या सीरिजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा
(WTC) दुसरा सिझन सुरू होत आहे. त्याचबरोबर मागील काही इंग्लंड दौऱ्यात पराभव झाल्यानं टीम इंडियासाठी ही सीरिज जिंकणे आवश्यक आहे. या सीरिजपूर्वी फ्रेश होण्यासाठी भारतीय खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे.
भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विननं
(R. Ashwin) या ब्रेकमध्येही नवी तयारी सुरु केली आहे. अश्विनला इंग्लंडमध्ये वर्क व्हिसा मिळाला तर तो या टेस्टपूर्वी सराव व्हावा म्हणून कांऊटी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. सरे
(Surrey) या काऊंटी टीमकडून अश्विन खेळण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी झाल्यास 11 जुलै रोजी सुरु होणाऱ्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये अश्विन मैदानात उतरेल.
'द ओव्हल'वर हा सामना होणार आहे. याच मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची टेस्ट होणार आहे. त्यामुळे अश्विनला सरेकडून खेळण्याची संधी मिळाली तर ते त्याला फायदेशीर ठरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी
(WTC Final) इंग्लंडमध्ये सराव न केल्याचा फटका टीम इंडियाला बसला होता. अश्विननं देखील पराभवानंतर ही बाब मान्य केली होती. ही चूक सुधारण्यासाठी तो आता कामाला लागला आहे.
टीम इंडियातील गोंधळावर BCCI नाराज, विराटलाही विचारला प्रश्न
टीम इंडिया करणार कोरोनाला 'आऊट'
इंग्लंडमध्ये कोरोना रुग्ण वाढत असतानाच भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल संपल्यानंतर खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक मिळाला आणि ते बायो-बबलच्या बाहेर आले. इंग्लंडमधलं कोरोनाचं संकट बघता बीसीसीआयने
(BCCI) खेळाडूंना कोरोना लसीचा दुसरा डोस द्यायची तयारी सुरू केली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाच्या खेळाडूंना बुधवार आणि शुक्रवारी कोरोना लसीचा
(Corona Vaccine) दुसरा डोस दिला जाईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. इंग्लंडला रवाना होण्याआधीच टीम इंडियाच्या बहुतेक खेळाडूंनी भारतात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. इंग्लंडमध्ये दुसरा डोस घ्यायचा असल्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना भारतात कोव्हिशिल्डचा पहिला डोस घ्यायला सांगितला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.