मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021, RCB vs SRH: डेव्हिड वॉर्नरनं टॉस जिंकला, विराटच्या टीममध्ये एक बदल

IPL 2021, RCB vs SRH: डेव्हिड वॉर्नरनं टॉस जिंकला, विराटच्या टीममध्ये एक बदल

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) सहावी मॅच होत आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) सहावी मॅच होत आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) सहावी मॅच होत आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे.

चेन्नई, 14 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) सहावी मॅच होत आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. बंगळुरु ही मॅच जिंकून विजयी घौडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असेल. तर हैदराबादला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी ही मॅच जिंकावी लागेल.

या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी बंगळुरुनं एक बदल केला असून देवदत्त पडिक्कलचा (Devdutt Padikkal) रजत पाटीदार याच्या जागेवर समावेश केला आहे. तर हैदराबादच्या टीममध्ये दोन बदल झाले असून जेसन होल्डर आणि शादाब नदीमचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.चेन्नईच्या पिचवर या सिझनमध्ये झालेल्या तीनपैकी दोन मॅच या पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमनं जिंकल्या आहेत.

बंगळुरुची टीम पहिल्या मॅचमध्ये देवदत्त पडिक्कल  शिवाय उतरली होती. देवदत्तला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यामुळे त्याला पहिल्या मॅचमध्ये आराम देण्यात आला होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं विराट कोहलीसह (Virat Kohli) बंगळुरुच्या डावाची सुरुवात केली होती. आता पडिक्कल टीममध्ये परतल्यानं तो विराटसह ओपनिंगला येईल.

देवदत्त हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिझनमध्ये त्यानं सर्वांना प्रभावित केलं. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतही त्यानं 147. 40 च्या सरासरीनं 737 रन काढले होते. यामध्ये चार सलग शतकांचाही समावेश आहे.

IPL वर पुन्हा फिक्सिंगचं सावट, KKR च्या माजी प्रशिक्षकावर 8 वर्षांची बंदी

बंगळुरुची Playing 11 : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्टीन, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल

हैदराबादची Playing 11 : डेव्हिड वॉर्नर, ऋद्धीमान साहा, मनिष पांडे, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम, टी. नटराजन

First published:
top videos

    Tags: IPL 2021, RCB, SRH, Virat kohli