मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: देवदत्त पडिक्कल कुणाचा? थरुर आणि माजी क्रिकेटपटूमध्ये जुंपली

IPL 2021: देवदत्त पडिक्कल कुणाचा? थरुर आणि माजी क्रिकेटपटूमध्ये जुंपली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) बॅट्समन देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यानं गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये शतक झळकावलं. त्याच्या शतकानंतर देवदत्त कुणाचा? हा वाद सुरु झाला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) बॅट्समन देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यानं गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये शतक झळकावलं. त्याच्या शतकानंतर देवदत्त कुणाचा? हा वाद सुरु झाला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) बॅट्समन देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यानं गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये शतक झळकावलं. त्याच्या शतकानंतर देवदत्त कुणाचा? हा वाद सुरु झाला आहे.

मुंबई, 23 एप्रिल : 'यशाचे वाटेकरी अनेक असतात' या वाक्याचा प्रत्यय आता आयपीएलमध्ये (IPL 2021) देखील येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) बॅट्समन देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यानं गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये शतक झळकावलं. देवदत्तनं राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध 52 बॉलमध्ये नाबाद 101 रन काढले. त्यानं विराट कोहली (Virat Kohli) सोबत केलेल्या 181 रनच्या पार्टरनरशिपमुळे आरसीबीनं राजस्थानचा 10 विकेट्सनं पराभव केला.  या कामगिरीनंतर देवदत्त कुणाचा? हा वाद सुरु झाला आहे.

या आयपीएल सिझनमधील हे दुसरं शतक आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) यानं पंजाब किंग्ज विरुद्ध शतक झळकावलं होतं. संजू सॅमसन हा केरळचा असून देवदत्त पडिक्कलही मल्याळी आहे. त्यामुळे त्याच्या शतकानंतर काँग्रेसचे केरळमधील खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांचा प्रादेशिक अभिमान उफाळून आला.

थरुर यांनी देवदत्तच्या शतकानंतर एक ट्विट केलं आहे. "या आयपीएलमधील दोन्ही शतक मल्याळी व्यक्तीनं लगावली आहेत. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. कारण केरळची  नेहमीच भारतीय क्रिकेटमधील बॅकवॉटर (backwater) अशी ओळख आहे. या आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन या दोघांचंही अभिनंदन.

शशी थरुर यांचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. माजी क्रिकेटपटू डोड्डा गणेश (Dodda Ganesh) यानं थरुर यांना उत्तर दिलं आहे.  "करुण नायर याने 2016 साली त्रिशतक झळकावल्यानंतर अनेकांनी त्याच्या कामगिरीचं क्रेडिट घेतलं होतं. करुणची टीममधील जागा गेल्यानंतर त्याचा त्यांना विसर पडला. देवदत्तबद्दलही तेच घडतय. ते दोघंही मल्याळी आहेत, हे मान्य. पण, करुण आणि देवदत्तच्या क्रिकेटपटू म्हणून झालेल्या जडणघडणीमध्ये केरळची काहीही भूमिका नाही. ते दोघंही कर्नाटकचे खेळाडू आहेत."  असं गणेशनं थरुर यांना उत्तर दिलं आहे.

डोड्डा गणेशचं हे ट्विट देखील आता व्हायरल झालं असून त्यावर देखील अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2021, Karnataka, Kerala, RCB, Shashi tharoor, Sports