• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी Good News, रोहितचा खास सहकारी फॉर्मात

IPL 2021 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी Good News, रोहितचा खास सहकारी फॉर्मात

दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिज विरुद्धची टी20 मालिका 3-2 ने जिंकली आहे. शनिवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा 25 रननं पराभव केला. या संपूर्ण मालिकेत मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) खास खेळाडू फॉर्मात होता.

 • Share this:
  मुंबई, 4 जुलै: दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिज विरुद्धची टी20 मालिका 3-2 ने जिंकली आहे. शनिवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा 25 रननं पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर बॅट्समन क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने या सामन्यात 60 रनची महत्त्वाची खेळी केली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये डी कॉक सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. डी कॉकने या टी20 मालिकेत 3 अर्धशतक झळकावली. त्याचबरोबर . त्याने यापूर्वी टेस्ट सीरिजमध्ये नाबाद 141 आणि 96 रन काढले होते. त्यानंतर पाच सामन्यांच्या  टी 20 मालिकेत 37, 26, 72, 60 आणि 60 रनची आक्रमक खेळी खेळली. त्याचा फॉर्म आगामी आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) मुंबई इंडियन्सला दिलासा देणारा आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी देखील डी कॉक फॉर्मात होता. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद 70 रनची खेळी खेळली होती. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 168 रन काढले. आफ्रिकेकडून डी कॉक शिवाय एडन मार्करमनं अर्धशतक झळकावलं. त्याने 48 बॉलमध्ये 70 रन काढले होते. आता आयपीएल स्पर्धेचा पुढील टप्पा सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये सुरु होणार आहे. यंदा मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची ऐतिहासिक संधी आहे. मुंबईचे हे मिशन पूर्ण करण्यासाठी डी कॉकचा फॉर्म निर्णायक ठरणार आहे. जेव्हा द्रविडनं धोनी आणि पठाणला दाखवला सिनेमा, इराफाननं सांगितला 'तो' किस्सा वेस्ट इंडिजला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांनी निर्धारित 20 ओव्हरध्ये 9 आऊट 143 रनपर्यंत मजल मारली.  वेस्ट इंडिजकडून इव्हान लुईसनं सर्वाधिक 52 रन काढले. तर हेटमायरनं 33 रनची खेळी केली. गेल, पोलार्ड आणि आंद्रे रसेल या वेस्ट इंडिजच्या दिग्गजांनी निराशा केली. रसेलला तर भोपळा देखील फोडता आला नाही.
  Published by:News18 Desk
  First published: