मुंबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेतील 'प्ले ऑफ' चं (IPL 2021 Playoffs) चित्रं आता स्पष्ट होत आहे. आतापर्यंत 4 पैकी 3 टीमनी 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. तर उर्वरित एका जागेसाठी 4 टीममध्ये चुरस सुरु आहे. सनरायझर्स हैदराबादची टीम (SRH) यापूर्वीच स्पर्धेतून बाद झाली आहे. महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) सीएसके, ऋषभ पंतची (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स आणि विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी या तीन टीमनं 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आता या टीममध्ये टॉप 2 मध्ये प्रवेश करण्यासाठी स्पर्धा आहे.
सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स या टीमनं प्रत्येकी 12 मॅच खेळल्या असून यामधून त्याचे 18 पॉईंट्स झाले आहेत. रनरेटच्या आधारावर सीएसके सध्या टॉप आहे. चेन्नईच्या आता दिल्ली आणि पंजाब विरुद्धच्या मॅच बाकी आहेत. त्यामुळे सीएसके विरुद्ध दिल्ली यांच्यात होणारी लढत ही महत्त्वाची आहे. या लढतीमध्ये नंबर 1 टीम कोण होणार हे निश्चित होईल. दिल्लीची अन्य एक लढत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. टॉप 2 मध्ये प्रवेश करण्यासाठी ही मॅच जिंकणेही दोन्ही टीमला आवश्यक आहे.
आरसीबीचे 12 मॅचनंतर 16 पॉईंट्स असून ही टीम पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलचीच्या या टीमच्या उर्वरित लढती दिल्ली आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहेत. त्यांनी या दोन्ही मॅच जिंकल्या तर टॉप 2 मध्ये प्रवेश करण्याची त्यांची शक्यता वाढेल. आरसीबीचा रनरेट हा चेन्नई आणि दिल्लीपेक्षा खराब आहे. त्यामुळे या दोन्ही टीमच्या मॅचवरही आरसीाबीची नजर असेल. दिल्ली आणि आरसीबीनं आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. तर सीएसकेनं 3 वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.
टॉप 2 चा फायदा
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये राहण्याचा मोठा फायदा आहे. या टीमचा मुकाबला क्वालिफायर 1 मध्ये होतो. ही मॅच जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये जाते. तर पराभूत झालेल्या टीमला आणखी एक संधी मिळते. एलिमेनेटर 3 आणि एलिमेनेटर 4 मध्ये प्ले ऑफ मधील दुसरी लढत होते. ही लढत जिंकणाऱ्या टीमला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या टीमविरुद्ध खेळावं लागतं. टॉप 2 मध्ये राहणाऱ्यांना फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एक अतिरिक्त संधी मिळते. त्यामुळे याचं मोठं महत्त्व आहे.
IPL 2021: जम्मू काश्मीरची नवी 'स्पीड गन', पहिल्याच मॅचमध्ये रचला इतिहास
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.