Home /News /sport /

IPL 2021: स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नवा वाद, 'त्या' खेळाडूंची फ्रँचायझींनी केली तक्रार

IPL 2021: स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नवा वाद, 'त्या' खेळाडूंची फ्रँचायझींनी केली तक्रार

आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेतील उर्वरित सामने सुरू होण्यास एक आठवडा बाकी असतानाच इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यांच्या माघारीनंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

    मुंबई, 12 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेतील उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यास एक आठवडा बाकी असतानाच इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान आणि ख्रिस वोक्स या तिघांनी वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांच्या माघारीनंतर नवा वाद निर्माण झाला आहे. जॉनी बेअरस्टो सनरायझर्स हैदराबादचा, मलान पंजाब किंग्जचा तर ख्रिस वोक्स दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य होता. आता हैदराबादनं शरफेन रदरफोर्ड तर पंजाबनं अ‍ॅडम मारक्रम यांचा टीममध्ये समावेश केला आहे. 'इनसाईड स्पोर्ट्स'नं दिलेल्या वृत्तानुसार फ्रँचायझींनी या खेळाडूंच्या माघारीनंतर बीसीसीआयला पत्र लिहलं आहे. एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'मी गुरुवारी खेळाडूंशी चर्चा केली. त्यावेळी सर्वांनी 15 सप्टेंबर रोजी टीममध्ये दाखल होण्यातं आश्वासन दिलं. त्यानंतर शनिवारी अचानक ते येणार नाहीत, असं आम्हाला समजलं. कोच आणि मॅनेजमेंटला या कारणांमुळे धक्का बसला आहे. हे पूर्णपणे अनप्रोफेशनल असून करारातील तरतूदींचा भंग करणारे आहे.' क्रिकेटपटू सध्या कोणत्या त्रासाचा सामना करत आहेत, याची आम्हाला जाणीव  असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. 'ते सतत बायो-बबलमध्ये राहत आहेत. त्यांना मानसिक थकवा आला आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण शेवटच्या क्षणी माघार घेतल्यानं आमच्यासाठी परिस्थिती अवघड होते.' असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन कोरोनाचा उद्रेक झाल्यानं मे महिन्यात स्थगित करण्यात आला होता. आता उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहेत. 12 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांच्या झेलल्या होत्या गोळ्या, कटू आठवणीसह क्रिकेटपटू पाकिस्तानात दाखल या आयपीएलमधून इंग्लंडच्या 6 खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांमुळे माघार घेतली आहे. जोफ्रा आर्चरनं दुखापतीमुळे, बेन स्टोक्सनं मानसिक कारणामुळे, जोस बटलरनं वडिल झाल्यानं तर अन्य तीन खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा लियाम लिविंग्स्टोन सध्या जखमी असून त्याचंही आयपीएलमध्ये खेळणे संदिग्ध आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021

    पुढील बातम्या