Home /News /sport /

IPL 2021: विराट कोहलीसाठी खूशखबर, भरवशाचा खेळाडू कमबॅकसाठी सज्ज

IPL 2021: विराट कोहलीसाठी खूशखबर, भरवशाचा खेळाडू कमबॅकसाठी सज्ज

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) पहिली मॅच जिंकून शानदार सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (RCB) एक खूशखबर आहे.

    चेन्नई, 14 एप्रिल : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) पहिली मॅच जिंकून शानदार सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (RCB) एक खूशखबर आहे. आरसीबीचा ओपनर आणि विराटचा भरवशाचा खेळाडू देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) हा बुधवारी होणारी मॅच खेळण्यासाठी सज्ज आहे. आरसीबीची बुधवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध मॅच होणार आहे. "देवदत्त पडिक्कल हा आता पूर्ण फिट असून सनरायझर्स विरुद्धची मॅच खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो बहुतेक ही मॅच खेळेल." असं आरसीबीचे 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट' माईक हेसन (Mike Hesson) यांनी स्पष्ट केलं आहे. फिन एलनचा क्वारंटाईन कालावधी संपला असून तो देखील चांगल्या टचमध्ये आहे. केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झम्पा हे दोन खेळाडू पुढील मॅचसाठी उपलब्ध होतील, असं हेसन यांनी यावेळी सांगितलं. यापूर्वी चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर देवदत्त बंगळुरमध्येच घरीच त्याच्यावर उपचार करण्यात  आले. तो पहिल्या मॅचपूर्वीच आरसीबीच्या टीममध्ये दाखल झाला होता. मात्र त्याचा मेडिकल कारणामुळे टीममध्ये  समावेश करण्यात आला नव्हता. देवदत्त हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिझनमध्ये त्यानं सर्वांना प्रभावित केलं. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतही त्यानं 147. 40 च्या सरासरीनं 737 रन काढले होते. यामध्ये चार सलग शतकांचाही समावेश आहे. (वाचा : IPL वर पुन्हा फिक्सिंगचं सावट, KKR च्या माजी प्रशिक्षकावर ICC नं घातली 8 वर्षांची बंदी! ) या आयपीएल सिझनच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) मुंबईचा 2 विकेटने पराभव केला. एबी डिव्हिलियर्सने 27 बॉलमध्ये सर्वाधिक 48 रन केले, तर मॅक्सवेलने 39 रनची आणि विराट कोहलीने 33 रनची खेळी केली.पण तिघंही चुकीच्या वेळी आऊट झाले. या सामन्यात बंगळुरुला शेवटच्या बॉलरवर विजयासाठी 1 रनची गरज होती
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, RCB, SRH

    पुढील बातम्या