अहमदाबाद, 29 एप्रिल : पृथ्वी शॉचं (Prithvi Shaw) या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक आणि त्याला शिखर धवननं (Shikhar Dhawan) दिलेली खंबीर साथ यामुळे दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा एकतर्फी पराभव केला आहे. केकेआरनं दिल्लीला विजयासाठी 155 रनचं आव्हान दिलं होतं. दिल्लीनं हे आव्हान ७ विकेट्स राखून पूर्ण केलं. शिखर धवननं 46 रन काढले. पृथ्वी-धवन जोडीनं पहिल्या विकेटसाठी 132 रनची पार्टरनरशिप केली. पृथ्वी शॉ ने 41 बॉलमध्ये 82 रनची आक्रमक खेळी केली. यामध्ये 11 फोर आणि 3 सिक्सचा समावेश आहे.
पृथ्वी शॉ नं दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यानं शिवम मावीच्या (Shivam Mavi) एकाच ओव्हरमध्ये सलग 6 फोर लगावले. आयपीएल इतिहासात एकाच ओव्हरमध्ये 6 फोर लगाणारा पृथ्वी हा दुसरा खेळाडू आहे.
पृथ्वी शॉ चा दिल्ली कॅपिटल्स टीममधील सहकारी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानं 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ही कामगिरी (RCB) केली होती. त्यावेळी रहाणे राजस्थान रॉयल्स (RR) टीमचा सदस्य होता. रहाणेनं श्रीनाथ अरविंदच्या ओव्हरमध्ये हा विक्रम केला होता.
Wd, 4, 4, 4, 4, 4, 4@PrithviShaw 24 (6) has set the stage on 🔥 Six boundaries in the 1st over bowled by Mavi.😳https://t.co/iEiKUVwBoy #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/5ISeFsKWA0
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
पहिल्याच ओव्हरमध्ये सहा फोर लगावल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या पृथ्वीनं संपूर्ण मॅचमध्ये वेगवान बॅटींग केली. त्यानं अवघ्या 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. या आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी पंजाब किंग्जच्या (PBKS) दीपक हुडानं राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध 20 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
5️⃣0️⃣🔥
There is no stopping @PrithviShaw. This is sensational batting. He brings up his half-century in 18 balls flat. It is the fastest in #IPL2021. 🙌🏾https://t.co/iEiKUVwBoy #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/jj6ZKFw2s8 — IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
यापूर्वी बर्थ-डे बॉय आंद्रे रसेलनं (Andre Russell) शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाताला 6 आऊट 154 पर्यंत मजल मारता आली. रसेलनं 27 बॉलमध्ये 2 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं नाबाद 45 रन केले. तर शूभमन गिलनं 43 रनची खेळी केली. दिल्लीकडून ललित यादव आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान आणि स्टॉईनिसला प्रत्येकी 1 विकेट्स घेतली. दिल्लीचा हा 7 मॅचमधील 5 विजय असून कोलकाताचा 7 मॅचमधील 5 वा पराभव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2021, KKR, Prithvi Shaw, Shikhar dhawan