Home /News /sport /

IPL 2021: टीम इंडियाला मिळाला नवा 'Captain Cool', पहिल्याच मॅचमध्ये केली गुरूवर मात

IPL 2021: टीम इंडियाला मिळाला नवा 'Captain Cool', पहिल्याच मॅचमध्ये केली गुरूवर मात

आयपीएलमध्ये शनिवारी झालेली मॅच ही गुरू महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि शिष्य ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या टीममध्ये होती. पंतनं अगदी टॉसपासून प्रत्येक बाबतीत धोनीवर मात केली.

    मुंबई, 11 एप्रिल : आयपीएलमध्ये शनिवारी झालेली मॅच ही गुरू महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि शिष्य ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या टीममध्ये होती. या मॅचमध्ये पंतच्या टीमनं  धोनीच्या टीमचा 7 विकेट्सनं मोठा पराभव केला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) जखमी झाल्यानं ऋषभ पंतला दिल्लीचा कॅप्टन करण्यात आलं आहे. कॅप्टन झाल्यानंतरच्या पहिल्याच परीक्षेत पंत चांगल्या मार्कांनी पास झाला. पंतनं अगदी टॉसपासून प्रत्येक बाबतीत धोनीवर मात केली. विकेट किपर, बॅट्समन आणि कॅप्टन या तीन्ही क्षेत्रामध्ये त्यानं शनिवारी स्वत:ला सिद्ध केलं. पंतला मागील आयपीएलमध्ये फार कमाल करता आली नव्हती. मात्र त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो चमकला. ऑस्ट्रेलियात झाली सुरुवात पंतला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्टमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली. त्या टेस्टमध्ये त्यानं फक्त 29 रन काढले पण ते टीम इंडियाच्या विजयात उपयोगी ठरले. पहिली टेस्ट मोठ्या फरकानं हरल्यानंतर भारतानं दुसरी टेस्ट जिंकून बरोबरी केली. त्यानंतर पंतनं सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये 118 बॉलमध्ये 97 रनची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियानं मॅचमध्ये पुनरागमन केलं आणि टेस्ट ड्रॉ केली. सिडनीनंतर ब्रिस्बेन टेस्टमध्येही पंतनं कमाल केली. भारताला विजयासाठी 328 रनचं आव्हानात्मक टार्गेट होतं. हे टार्गेट पंतच्या बळावर टीम इंडियानं पूर्ण केलं. पंतनं नाबाद 89 रन काढत भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडला दाखवला इंगा ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड विरुद्ध मायदेशात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये पंतचा खेळ आणखी बहरला. त्यानं 4 टेस्टमध्ये 54 च्या सरासरीनं 270 रन काढले. त्या सीरिजमध्ये रोहितनंतर सर्वात जास्त रन करणारा तो दुसरा भारतीय होताय स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर त्यानं विकेट किपिंग करत 13 विकेट्स घेतल्या. इंग्लंड विरुद्धच्या टी-20 आणि वन-डे मालिकेतही पंतचा जलवा कायम होता. पहिल्याच मॅचमध्ये धोनीला हरवलं! कॅप्टन श्रेयस अय्यर जखमी झाल्यानं दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल सुरु होण्यापूर्वी धक्का बसला होता. अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथ या सर्व वरीष्ठ खेळाडूंना बाजूला करत दिल्लीच्या मॅनेजमेंटनं पंतवर विश्वास ठेवला. ( पृथ्वी शॉ ने काढले 38 बॉलमध्ये 72 रन! पॉन्टिंगची बोलती बंद ) पंतनं ही मोठी जबाबदारी पेलण्यास आपण सज्ज असल्याचं चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये दाखवून दिलं. त्यानं त्याचा गुरू असलेल्या धोनीच्या टीमला हरवलं. पंत गेल्या काही महिन्यापासून यशाची वेगवेगळी शिखरं सर करत आहे. या आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणूनही तो मोठी कामगिरी करेल अशी आशा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, MS Dhoni, Rishabh pant

    पुढील बातम्या