चेन्नई, 26 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील या सिझनमध्ये (IPL 2021) सर्वात तरुण कॅप्टन असलेल्या ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) रविवारी आणखी एक विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सनं सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पराभव केला. दोन्ही टीममध्ये अगदी शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगली होती. या मॅचमध्ये ऋषभ पंतच्या एका कृतीनं सर्वांचं मन जिंकलं. सनरायझर्स हैदराबादची बॅटींग सुरु असताना हा प्रसंग घडला. अक्षर पटेल (Axar Patel) दिल्लीकडून 13 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरचा शेवटचा बॉल केन विल्यमसननं टोलावला आणि तो एक रन काढण्यासाठी पुढे पळाला. विल्यमसननं टोलावलेला बॉल ऋषभ पंतनं पळत जाऊन अडवला आणि वेगानं नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेनं फेकला. त्यावेळी पंतनं केलेला थ्रो अंपायरला लागला. अंपायरला बॉल लागल्याचं पाहताच पंतला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्यानं ताततडीनं अंपायरची माफी मागितली. पंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने दिल्लीला 8 रनचं आव्हान दिलं होतं, हे आव्हान शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी पूर्ण केलं. हैदराबादने या 8 रन रोखायला राशिद खानला बॉलिंग दिली, पण ऋषभ पंतने तिसऱ्या बॉलला फोर मारून दिल्लीचा विजय सोपा केला. त्याआधी दिल्लीकडून अक्षर पटेलने सुपर ओव्हर टाकली. डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियमसन यांना अचूक बॉलिंग करत अक्षरने फक्त 7 रनच दिले. धोनीचा सल्ला आणि जडेजानं मॅक्सवेलला केलं आऊट, पाहा VIDEO दिल्ली कॅपिटल्सचा हा या स्पर्धेतील चौथा विजय असून या विजयामुळे दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सची पुढील लढत मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी (RCB) होणार आहे. तर सनरायझर्स हैदराबादची पुढची मॅच बुधवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध आहे.