मुंबई, 26 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
(RCB vs CSK) यांच्यामध्ये रविवारी झालेली आयपीएल स्पर्धेतील मॅच अगदीच एकतर्फी झाली. रवींद्र जडेजाच्या ऑल राऊंड कामगिरीमुळे ही मॅच एकतर्फी झाली. या मॅचमध्ये रविंद्र जडेजानं बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीन्ही क्षेत्रामध्ये जोरदार कामगिरी केली. या कामगिरीमध्ये जडेजाला सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी
(MS Dhoni) याची मोठी मदत झाली.
चेन्नईनं दिलेल्या 192 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं जोरदार सुरुवात केली होती. देवदत्त पडिक्कलनं 15 बॉलमध्येच 34 रनची आक्रमक खेळी केली. यामध्ये त्यानं 2 सिक्स आणि 4 फोर लगावले. बंगळुरुच्या इनिंगला ब्रेक लावण्याचं काम जडेजानं केलं. त्यानं वॉशिंग्टन सुंदरला 7 रन राढून आऊट केलं. त्यापाठोपाठ आरसीबीच्या बॅटींगचा कणा असलेले एबी डीव्हिलियर्स
(AB de Villiers) आणि ग्लेन मॅक्सवेलला
(Glenn Maxwell) आऊट करत चेन्नईच्या विजयाचं दार उघडलं.
जडेजा 9 व्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आल्यावर हा प्रकार घडला. जडेजाच्या समोर ग्लेन मॅक्सवेल बॅटींग करत होता. त्यावेळी धोनीनं जडेजाला 'मारने दे, सोच के मार मत खाना' असा सल्ला दिला. धोनीनं हा सल्ला देताच पुढच्याच बॉलवर जडेजानं मॅक्सवेलला बोल्ड केलं. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
यापूर्वी रविंद्र जडेजाने एकाच ओव्हरला काढलेल्या 37 रनच्या जोरावर चेन्नईने बँगलोरला विजयासाठी 192 रनचं आव्हान दिलं. हर्षल पटेलच्या
(Harshal Patel) शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाने 5 सिक्स, एक फोर आणि एकदा दोन रन काढले, तसंच हर्षल पटेलने या ओव्हरमध्ये एक नो बॉलही टाकला. 19व्या ओव्हरपर्यंत चेन्नईचा स्कोअर 154/4 एवढा होता, पण 20वी ओव्हर संपल्यानंतर 191/4 झाला.
IPL 2021 मधून विदेशी खेळाडूंची गळती सुरुच, आणखी दोघांची माघार
रविंद्र जडेजाने 28 बॉलमध्येच 221.43 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 62 रन केले, यात 5 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तर फाफ डुप्लेसिसने 50, ऋतुराज गायकवडाने 33, रैनाने 24, रायुडूने 14 रनची खेळी केली. बँगलोरकडून हर्षल पटेलला 3 आणि युझवेंद्र चहलला 1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.