मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 'रन'वीर शिखर धवननं पंजाबच्या बॉलर्सची केली धुलाई, कोहली-शास्त्रींना दिलं चोख उत्तर

IPL 2021: 'रन'वीर शिखर धवननं पंजाबच्या बॉलर्सची केली धुलाई, कोहली-शास्त्रींना दिलं चोख उत्तर

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021)  शिखर धवन (Shikhar Dhawan) चांगलाच फॉर्मात आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) ओपनिंग बॅट्समननं  रविवारी 49 बॉलमध्ये 92 रन करत टीमला विजय मिळवून दिला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 एप्रिल: आयपीएल स्पर्धेत (IPL 2021)  शिखर धवन (Shikhar Dhawan) चांगलाच फॉर्मात आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) ओपनिंग बॅट्समननं  रविवारी 49 बॉलमध्ये 92 रन करत टीमला विजय मिळवून दिला. पंजाब किंग्जनं (Punjab Kings) पहिल्यांदा बॅटींग करत 196 रनचं मोठं टार्गेट ठेवलं होतं. धवननं 31 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. तर 49 बॉलमध्ये 92 रन काढले. धवनचं शतक हुकलं पण त्यानं या खेळातून त्याच्या टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे.

टी20 क्रिकेटमध्ये संथ खेळ खेळत असल्याची शिखर धवनवर अनेकदा टीका झाली आहे. त्यामुळे अनेकदा धवनच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. इंग्लंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेतही धवनला 1 मॅचनंतर वगळण्यात आलं होतं. आता या आयपीएल सिझनमधील पहिल्या तीन मॅचमध्येच धवननं आपण टी20 क्रिकेटसाठी योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे.

धवननं पटाकवली ऑरेंज कॅप

शिखर धवननं या आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन केलेले आहेत. त्यानं 3 मॅचमध्ये 186 रन काढले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 62 तर स्ट्राईक रेट 163.15 आहे. त्यामुळे सर्वात जास्त रन काढणाऱ्या बॅट्समनला देण्यात येणारी ऑरेंज कॅप सध्या धवनच्या डोक्यावर आहे. धवननं या स्पर्धेत दोन अर्धशत झळकावले असून या दोन्ही मॅचमध्ये टीमला विजय मिळवून दिला.

टार्गेटचा पाठलाग करताना धवन आणखी रंगात येतो. त्यानं आयपीएलमध्ये रनचा पाठलाग करताना 18 अर्धशतक झळकावले असून त्याची सरासरी 63.51 आहे. धवनप्रमाणेच गौतम गंभीरनंही 18 अर्धशतक झळकावली आहेत. तर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर टार्गेटचा पाठलाग करताना 17 अर्धशतक आहेत. आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त 45 अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही शिखर धवनच्याच नावावर आहे. या यादीमध्ये विराट कोहली (44 अर्धशतक) धवनच्या मागं आहे.

युजवेंद्र चहलला स्पर्धेतील पहिली विकेट मिळताच पत्नी धनश्री इमोशनल, पाहा PHOTO

शिखर धवननं 2017 नंतर त्याच्या खेळात मोठा बदल केला आहेत. 2008 ते 2016 या काळात त्याला फक्त 1 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' हा पुरस्कार मिळाला होता. मात्र 2018 पासून त्यां 8 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. टी20 क्रिकेटमध्ये वेगानं बॅटिंग करणं आणि टीमला जिंकून देण्याचं काम आपल्याला जमतं हे धवननं या आयपीएलमध्ये दाखवून दिलं आहे. त्याच्या या खेळाची  कोहली-शास्त्री जोडी दखल घेणार का? हा प्रश्न आहे.

First published:

Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021, Ravi shashtri, Shikhar dhavan, Virat kohli