जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: मुंबईविरुद्ध खळ्ळ-खट्याक, थोडक्यात वाचले खेळाडू!

IPL 2021: मुंबईविरुद्ध खळ्ळ-खट्याक, थोडक्यात वाचले खेळाडू!

IPL 2021: मुंबईविरुद्ध खळ्ळ-खट्याक, थोडक्यात वाचले खेळाडू!

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या मॅचमध्ये सिक्सचा वर्षाव झाला. ही फटकेबाजी सुरु असताना मुंबई इंडियन्सचे खेळाडू थोडक्यात बचावले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या मॅचमध्ये सिक्सचा वर्षाव झाला. मुंबईच्या कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यानं फक्त 34 बॉलमध्ये नाबाद 87 रनची आक्रमक खेळी केली. पोलार्डच्या या खेळीत 8 सिक्सचा समावेश होता. मुंबईकडून पोलार्ड तर चेन्नईकडून अंबाती रायुडू (Ambati Rayudu) यानं आक्रमक फटकेबाजी केली. रायुडूनं फक्त 27 बॉलमध्ये नाबाद 72 रन काढले. यामध्ये 4 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. रायुडूच्या या खेळीत त्यानं मारलेल्या एका सिक्समुळे डगआऊटमधील फ्रिजची काच फुटली. यावेळी त्या फ्रिजच्या बाजूला बसलेले मुंबईचे खेळाडू थोडक्यात वाचले.

News18

या आयपीएलमध्ये एखाद्या बॅट्समननं मारलेल्या शॉट्समुळे फ्रिज फुटण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने देखील मुंबई इंडियन्स विरुद्ध अशाच प्रकारचा सिक्स मारला होता. बेअरस्टोनं ट्रेंट बोल्टच्या बॉलवर इतक्या जोरात सिक्स मारला की तो डगआऊटमध्ये ठेवलेल्या फ्रिजला धडकला. यामुळे फ्रिचच्या काचेचा चुरा झाला. या फ्रिजच्या जवळ हैदराबादचे खेळाडू बसले होते. सुदैवानं यापैकी कुणालाही तो बॉल लागला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

जाहिरात

बेअरस्टोच्या आक्रमक खेळीप्रमाणेच रायुडूची आक्रमक खेळी देखील अखेर व्यर्थ ठरली. मुंबई इंडियन्सनं अगदी शेवटच्या बॉलवर चेन्नई सुपर किंग्सचा 4 विकेट्सनं पराभव केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात