• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: डेव्हिड वॉर्नरची चूक ठरली भारी, दिल्लीला मिळालं विजयाचं गिफ्ट!

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरची चूक ठरली भारी, दिल्लीला मिळालं विजयाचं गिफ्ट!

दिल्ली कॅपिटल्सनं (DC) सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये सनराझर्स हैदराबादचा (SRH) पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) यानं केलेली एक चूक त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

 • Share this:
  चेन्नई, 26 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्सनं (DC) सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये सनराझर्स हैदराबादचा (SRH) पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने दिल्लीला 8 रनचं आव्हान दिलं होतं, हे आव्हान शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी पूर्ण केलं. दिल्लीकडून सुरुवातीला अक्षर पटेलनं (Axar Patel) सुपर ओव्हर टाकली. त्यानं अचूक बॉलिंग करत फक्त 7 रन दिले. या सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) यानं केलेली एक चूक त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. हैदराबादनं पहिल्यांदा बॅटींग करताना 8 रन केले होते. शेवटच्या बॉलवर वॉर्नर-विल्यमसन जोडीनं 2 रन पळून काढले. मात्र यापैकी एक रन वॉर्नरनं अर्धवट पूर्ण केला. (Short run) त्यामुळे हैदराबादच्या स्कोअरमधील एक रन कमी झाला आणि दिल्लीला विजयासाठा 8 रनचं लक्ष्य मिळालं.  हैदराबादकडून राशिद खाननं सुपर ओव्हर टाकली. त्या ओव्हरमध्ये दिल्लीला अगदी शेवटच्या बॉलपर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागला. वॉर्नरनं शॉर्ट रन काढण्याची चूक केली नसती तर कदाचित या मॅचचं चित्र वेगळं असतं. वॉर्नरची चूक हैदराबादला भारी पडली. त्यामुळेच दिल्लीला विजयाचं गिफ्ट मिळालं. दिल्ली कॅपिटल्सचा बॅट्समन शिखर धवननं देखील मॅचनंतर बोलताना वॉर्नरच्या चुकीचा उल्लेख केला. " या छोट्या गोष्टींचा खूप प्रभाव पडतो. डेव्हिड वॉर्नरनं तो रन पूर्ण केला नाही म्हणून मी खूश आहे. आम्हाला याचा फायदा झाला आणि आम्ही मॅच जिंकण्यात यशस्वी ठरलो.'' असं धवननं सांगितलं.” सेहवागची तिखट प्रतिक्रिया दरम्यान, डेव्हिड वॉर्नरच्या एका निर्णयावर टीम इंडियाचा माजी बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सुपर ओव्हरमध्ये जॉनी बेयरस्टो बॅटींगला येईल, असाच सर्वांचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरसह केन विल्यमसन सुपर ओव्हरमध्ये बॅटींगला आला. या दोघांना 6 बॉलमध्ये 7 रन काढता आले. वॉर्नरच्या या निर्णयावर सेहवागनं जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. अंपायरला लागला थ्रो! त्यानंतर पंतनं केलेली कृती पाहून वाटेल अभिमान, VIDEO वीरेंद्र सेहवागनं या विषयावर खरमरीत ट्विट केलं आहे. "जर बेयरस्टो टॉयलेटमध्ये नसेल तर मला ही गोष्ट समजलेली नाही. 18 बॉलमध्ये 38 रन केल्यानंतरही तो सनरायझर्स हैदराबादची पहिली पसंती का नव्हता? हैदराबादच्या टीमनं या मॅचमध्ये जोरदार संघर्ष केला, पण या पराभवाला ते स्वत: जबाबदार आहेत. त्यांनी चमत्कारिक निर्णय घेतले.'' अशी टीका सेहवागनं केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: