मुंबई, 26 एप्रिल: आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनला (IPL 2021) विदेशी खेळाडूंच्या गळतीचं ग्रहण लागलं आहे. अॅडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. हे दोघंही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचे सदस्य आहेत. आरसीबीनं त्यांच्या ट्विटर हँडरलवरुन याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. ‘अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाला परत जाण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे ते उर्वरित आयपीएल सिझनसाठी उपलब्ध नसतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून त्यांना शक्य ती सर्व मदत करणार आहे,’ असं आरसीबीनं जाहीर केलंय.
केन रिचर्डसन या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकमेव मॅच खेळली होती. तर झम्पानं एकही मॅच न खेळता माघार घेतली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर एन्ड्रयू टाय (Andrew Tye) याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. टाय हा राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सदस्य आहे. 34 वर्षांच्या ऍन्ड्रयू टायने ऑस्ट्रेलियासाठी 7 वनडे आणि 28 टी-20 खेळल्या. आयपीएलच्या या मोसमात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. टायने शेवटा सामना बिग बॅश लिगमध्ये पर्थ स्क्रॉचर्ससाठी सिडनी सिक्सर्सविरुद्ध खेळला होता. राजस्थान रॉयल्सचा लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) देखील बायो-बबलच्या त्रासामुळे आधीच आयपीएल सोडून गेला. ‘बेयरस्टो टॉयलेटला गेला होता का?’, ‘त्या’ निर्णयावर सेहवागचा वॉर्नरला तिखट प्रश्न दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) प्रमुख बॉलर आर. अश्विननं (R. Ashwin) देखील कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानं आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रविवारची मॅच झाल्यानंतर अश्विननं ही घोषणा केली आहे. माझं कुटुंब सध्या Covid-19 शी लढा देत आहे. त्यामुळे या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. जर गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएलमध्ये खेळेल असं अश्विननं जाहीर केलं आहे.