मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : CSK ला मोठा धक्का, बायो बबलचं कारण देत आणखी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूची माघार!

IPL 2021 : CSK ला मोठा धक्का, बायो बबलचं कारण देत आणखी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूची माघार!

आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सुरु होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी बाकी आहे.  स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच चेन्नई सुपर किंग्सला (CSK) मोठा धक्का बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 1 एप्रिल : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सुरु होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी बाकी आहे.  स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच चेन्नई सुपर किंग्सला (CSK) मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा फास्ट बॉलर जोश हेजलवुड (Josh Hazlewood) याने माघार घेतली आहे. आगामी टी20 वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेस मालिका डोळ्यासमोर ठेवून हेजलवुडनं हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बायो बबलपासून दूर आपल्या कुटुंबासोबत राहण्याचदेखील त्याची इच्छा आहे. चेन्नई सुपर किंग्सची पहिली मॅच 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध होणार आहे.

हेजलवुडनं 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या वेबसाईटशी बोलताना या स्पर्धेतील माघारीचं कारण दिलं आहे. 'बायो बबल आणि वेगवेगळ्या काळात क्वारंटाईन राहून 10 महिने उलटले आहेत. त्यामुळे मी सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आम्हाला नंतरच्या कालावधीमध्येही बरंच क्रिकेट खेळायचं आहे,' असे हेजलवुडने स्पष्ट केले.

'आम्हाला वेस्ट इंडिजचा मोठा दौरा करायचा आहे. त्यानंतर बांगलादेश दौरा, टी 20 वर्ल्ड कप आणि नंतर अ‍ॅशेस यामुळे पुढील 12 महिने अतिशय व्यस्त असतील.  या काळात मला स्वत:ला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट राहयचं आहे. त्यामुळे मी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,' असे हेजलवुडने सांगितले.

आयपीएलमधून माघार घेणारा हेजलवुड हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. यापूर्वी जोश फिलिपे आणि मिचेल मार्श यांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.  आयपीएलदरम्यान एवढा काळ आपण बायो-बबलमध्ये राहू शकत नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मार्शने सांगितलं. मार्शने याबाबत बीसीसीआय (BCCI) आणि सनरायजर्स हैदराबादला याबाबत माहिती दिली आहे.

IPL 2021 आधी पुजाराने बदलली बॅटिंग स्टाईल, SIX चा पाऊस, पाहा VIDEO )

आयपीएलच्या मागच्या मोसमातही मार्श एकच मॅच खेळून बाहेर झाला होता. बँगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये मार्शच्या पायाला दुखापत झाली होती, त्यानंतर तो एकही सामना खेळू शकला नव्हता. हैदराबादने त्यावेळी मार्शऐवजी जेसन होल्डरला (Jason Holder) संधी दिली होती. यावेळी मिचेल मार्शच्या जागी जेसन रॉयची (Jason Roy) निवड करण्यात आली आहे.

First published:

Tags: BCCI, Biobubble, Cricket, Csk, Delhi capitals, IPL 2021, Sports