मुंबई, 3 एप्रिल : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जोश हेजलवूड (Josh Hazlewood ) याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. हेजलवूडनं हा निर्णय जाहीर करताच सोशल मीडियावर अनेकांनी त्याला चेतेश्वर पुजारावरुन (Cheteshwar Pujara) ट्रोल केलं होतं. ट्विटरवरही (Twitter) हा विषय ट्रेंडिग होता. चेतेश्वर पुजारा सदस्य असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) अधिकृत ट्विटर हँडलवरुनही या विषयावर पुजाराला एक मजेशीर प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न सध्या चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.
सीएसकेनं पुजाराचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पुजारा एका जागेवर बसून काही तरी विचार करत आहे. त्या ट्विटला 'काय झाले चिपू जोश?' असं कॅप्शन दिलं आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजारानं हेजलवूडला चांगलंच त्रस्त केलं होतं. पुजाराची विकेट घेण्यासाठी हेजलवूडला घाम गाळावा लागला होता. याच कारणामुळे पुजारा आणि हेजलवूड एकाच आयपीएल टीममध्ये आल्यानंतर क्रिकेट फॅन्स दोघांनाही ट्रोल करत होते.
ChePu Josh, what happened? #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/gOBR7PPfRW
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 1, 2021
हेजलवूडनं माघार का घेतली?
हेजलवूडनं 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या वेबसाईटशी बोलताना या स्पर्धेतील माघारीचं कारण दिलं आहे. 'बायो बबल आणि वेगवेगळ्या काळात क्वारंटाईन राहून 10 महिने उलटले आहेत. त्यामुळे मी सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आम्हाला नंतरच्या कालावधीमध्येही बरंच क्रिकेट खेळायचं आहे,' असे त्याने स्पष्ट केले.
( वाचा : IPL 2021 : क्वारंटाईनला कंटाळलेल्या डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्मानं केलं ट्रोल! )
'आम्हाला वेस्ट इंडिजचा मोठा दौरा करायचा आहे. त्यानंतर बांगलादेश दौरा, टी 20 वर्ल्ड कप आणि नंतर अॅशेस यामुळे पुढील 12 महिने अतिशय व्यस्त असतील. या काळात मला स्वत:ला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट राहयचं आहे. त्यामुळे मी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,' असे हेजलवूडने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.