मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: पंजाबला मोठा धक्का, ख्रिस गेल आयपीएलमधून बाहेर! ‘हे’ आहे कारण

IPL 2021: पंजाबला मोठा धक्का, ख्रिस गेल आयपीएलमधून बाहेर! ‘हे’ आहे कारण

आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्जला (Punjab Kings) मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख बॅट्समन आणि टी20 क्रिकेटचा सुपरस्टार ख्रिस गेल (Chris Gayle)  याने आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 1 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्जला (Punjab Kings) मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख बॅट्समन आणि टी20 क्रिकेटचा सुपरस्टार ख्रिस गेल (Chris Gayle)  याने आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Chris Gayle has pulled out of the remainder of IPL 2021) आज (शुक्रवारी) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाबची महत्त्वाची मॅच आहे. त्या मॅचपूर्वीच गेल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

गेलनं सतत बायो-बबलमध्ये राहण्यानं आलेल्या थकव्यामुळे ही स्पर्धा सोडली आहे. पंजाब किंग्जनं गेलच्या वतीनं ही माहिती दिली आहे. ‘गेल्या काही महिन्यांपासून मी क्रिकेट वेस्ट इंडिज, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि आता आयपीएलच्या बायो-बबलचा भाग आहे. मला मानसिकदृष्ट्या स्वत:ला फ्रेश ठेवायचं आहे. त्यानंतर दुबईमध्येच होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजला मदत करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे मी आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.' असं स्पष्ट केलं आहे.

मला आराम करण्याची परवानगी दिल्याबद्दल पंजाबच्या टीमचे आभार, माझ्या शुभेच्छा नेहमीच त्यांच्यासोबत असतील.’ गेलनं या आयपीएलमध्ये 10 मॅच खेळल्या आहेत. उर्वरित सिझनमध्ये त्याच्या जागी कुणाचा समावेश करणार?  हे पंजाबनं अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

IPL 2021 : मुंबई इंडियन्स Play off ला पोहोचणार का नाही? असं आहे गणित

पंजाब किंग्जनं दिला पाठिंबा

पंजाब किंग्जनं नंतर आणखी एक ट्विट करत ख्रिस गेलच्या निर्णयाचा आदर करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘एक फ्रँचायझी म्हणून पंजाब किंग्जला ख्रिस गेलच्या निर्णयाचा आदर आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी ‘युनिवर्स बॉस’ला खूप खूप शुभेच्छा.’

गेलची या आयपीएलमधील कामगिरी

ख्रिस गेलनं या आयपीएलमधील 10 मॅचमध्ये 193 रन काढले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 21.44 असून स्ट्राईक रेट 125.32 इतका होता. या आयपीएलमध्ये एकही अर्धशतक गेलला झळकावता आलेलं नाही.

First published:

Tags: Chris gayle, IPL 2021, Punjab kings