मुंबई, 4 एप्रिल : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची (COVID 19) संख्या सातत्यानं वाढत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium, Mumbai) आठ कर्मचाऱ्यांना (groundsmen) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये या सिझनमध्ये (IPL 2021) आयपीएल सामने होणार का? हा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) उत्तर दिलं आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईमध्ये नियोजित वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल सामने होतील, असा विश्वास बीसीसीआयनं व्यक्त केला आहे. मुंबईत 10 ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये आयपीएलचे 10 सामने होणार आहेत. इतक्या कमी कालावधीत अन्य ठिकाणी बायो-बबल तयार करणे शक्य नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती आणखी गंभीर झाली तर हैदराबाद आणि इंदूरमध्ये हे सामने खेळवण्यात येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याबाबत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'हैदराबाद हा एक पर्याय आहे. मात्र इतक्या कमी कालावधीमध्ये सामने दुसऱ्या शहरात खेळवणे व्यवहारिक नाही. सर्व कारणांचा विचार करुन मुंबईतच सामने खेळवण्याचा आमचा विचार आहे.'
अक्षर पटेलला कोरोना
आययपीएल सामन्यांसाठी सध्या मुंबईत असलेला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)टीमचा ऑल राऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) याला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षरला कोरोनाची लागण झाली असून त्याला इतरांपेक्षा वेगळं ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तो सध्या सर्व कोरोना प्रोटोकॉलचं पालन देखील करत आहे.
कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षी आयपीएल स्पर्धा (IPL 2020) युएईमध्ये झाली होती. यंदा ही भारतात होत आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा ही मैदानातील प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. तसंच स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडू तसंच कर्मचाऱ्यांना बायो-बबलचे पालन करणे बंधनकारक आहे.
( वाचा : IPL 2021 : क्वारंटाईनला कंटाळलेल्या डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्मानं केलं ट्रोल! )
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) या सामन्यानं 9 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये आयपीएल स्पर्धा सुरु होईल. 30 पर्यंत ही स्पर्धा चालणार असून फायनल मॅच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, IPL 2021, Mumbai, Wankhede stadium