चेन्नई, 2 एप्रिल : आयपीएल स्पर्धा सुरु होण्यास (IPL 2021) आता आठवडा उरला आहे. सर्वच टीमची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यापैकी अंतिम 11 मध्ये कोण खेळणार याचा अंदाज सर्व जण करत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंट्रेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) त्याच्या सखोल विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहे. आकाशने चेन्नई सुपर किंग्सच्या संभाव्य 11 (Chennai Super Kings Playing 11) खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे कृष्णप्पा गौतमला (K. Gowtham) या टीममध्ये जागा नाही. गौतमला यावर्षी झालेल्या लिलावात त्याच्या बेस प्राईजच्या 46 पट जास्त म्हणजेच 9.25 कोटी रुपये देऊन चेन्नईनं खरेदी केलं आहे.
आकाश चोप्रानं त्याच्या प्लेइंग 11 मध्ये रॉबिन उथप्पाची देखील निवड केलेली नाही. उथप्पाला चेन्नईनं राजस्थान रॉयल्सकडून खरेदी केलं आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अलीला देखील आकाश चोप्रानं निवडलेल्या टीममध्ये जागा नाही.
कोणत्या खेळाडूंचा समावेश?
आकाश चोप्रानं चेन्नई सुपर किंग्सचे ओपनर म्हणून ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसी यांना निवडले आहे. ऋतुराजनं मागच्या सिझनमध्ये चांगला खेळ केला होता. तर फाफ हा चेन्नईचा एक अनुभवी खेळाडू आहे. सुरेश रैनाचा तिसरा नंबर अंबाती रायडूला दिला आहे. तर रैनाला चौथा क्रमांकावर जागा दिली आहे. त्यानंतर धोनी, जडेजा आणि सॅम करन अशी आकाश चोप्राची बॅटींग ऑर्डर आहे.
(वाचा : IPL 2021 : धोनी-रोहितमध्ये होणार सगळ्यात मोठ्या रेकॉर्डसाठी स्पर्धा )
बॉलर्समध्ये आकाशनं कृष्णप्पा गौतमच्या जागी लेग स्पिनर कर्ण शर्माची निवड केली आहे. तर दिपक चहर, शार्दुल ठाकूर या फास्ट बॉलर्सना टीममध्ये जागा घेतली आहे. आकाशनं त्याच्या संभाव्य 11 मध्ये जोश हेजलवुडचाही समावेश केला होता. पण आता हेजलवुडनं या स्पर्धेतून नाव मागं घेतलं आहे.
आकाश चोप्राची संभाव्य टीम : फाफ ड्युप्लेसी, ऋतुराज गायकवाड, अंबती रायडू, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, सॅम करन, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवुड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.