जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : कोलकात्याकडून राजस्थानचा धुव्वा, मावी-नागरकोटीची भेदक बॉलिंग

IPL 2020 : कोलकात्याकडून राजस्थानचा धुव्वा, मावी-नागरकोटीची भेदक बॉलिंग

IPL 2020 : कोलकात्याकडून राजस्थानचा धुव्वा, मावी-नागरकोटीची भेदक बॉलिंग

IPL 2020 कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)च्या भेदक बॉलिंगपुढे राजस्थान (Rajasthan Royals)ची धुळधाण उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 30 सप्टेंबर : कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)च्या भेदक बॉलिंगपुढे राजस्थानची धुळधाण उडाली आहे. आयपीएल (IPL 2020)च्या 12व्या मॅचमध्ये कोलकात्याचा 37 रनने विजय झाला आहे. कोलकात्याने ठेवलेल्या 175 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 137/9 पर्यंत मजल मारली. शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती यांच्या बॉलिंगपुढे राजस्थानचे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले. शिवम मावीने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर कमलेश नागरकोटीला 2 ओव्हरमध्ये 13 रन देऊन 2 विकेट मिळाल्या. वरुण चक्रवर्तीनेही 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन राजस्थानच्या 2 खेळाडूंना माघारी धाडलं. सुनील नारायण, पॅट कमिन्स आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. कोलकात्याने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर 42 रन असतानाच राजस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या मॅचमध्ये राजस्थानचे 8 बॅट्समन एक अंकी स्कोअर करून आऊट झाले. टॉम कुरनने 36 बॉलमध्ये सर्वाधिक 54 रन केले. या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. 20 ओव्हरमध्ये कोलकात्याला 6 विकेट गमावून 174 रन करता आल्या. शुभमन गिलने सर्वाधिक 47 रनची खेळी केली, तर इओन मॉर्गनने 23 बॉलमध्ये 34 रन करून कोलकात्याला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन 2 विकेट घेतल्या. अंकित राजपूत, जयदेव उनाडकट, टॉम कुरन आणि राहुल टेवटियाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला राजस्थानचा हा पहिलाच पराभव आहे. याआधीच्या दोन्ही मॅचमध्ये राजस्थानला विजय मिळाला होता. राजस्थानविरुद्धच्या या विजयासोबतच कोलकात्याची टीम पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर राजस्थानची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीची टीम चांगल्या नेट रन रेटमुळे पहिल्या क्रमांकावर आहे. या तिन्ही टीम आणि आरसीबीच्या खात्यात आतापर्यंत 4 पॉईंट्स जमा झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2020
  • First Published :
जाहिरात
जाहिरात