दुबई, 1 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)यांच्यात झालेल्या मॅचमध्ये कोलकात्याचा 37 रननी विजय झाला. या सामन्यात राजस्थानचा स्टार खेळाडू संजू सॅमसन (Sanju Samson)ची बॅट चालली नाही, पण त्याने घेतलेल्या एका कॅचमुळे सगळ्यांनाच धक्का दिला. संजू सॅमसनच्या या शानदार कॅचनंतर सोशल मीडियावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)चा एक जुना कॅच व्हायरल होत आहे. कोलकात्याच्या इनिंगच्या 18व्या ओव्हरमध्ये टॉम करनच्या बॉलिंगवर संजू सॅमसनने पॅट कमिन्सचा भन्नाट कॅच पकडला. कमिन्सने टॉम करनच्या बॉलवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या संजू सॅमसनने हवेत उडून कॅच पकडला. पण हा कॅच पकडताना संजू सॅमसन मोठ्या अपघातातून वाचला. कॅच पकडल्यानंतर सॅमसनचं डोकं जमिनीवर आपटलं, तरीही सॅमसनने हातातला बॉल सोडला नाही. यानंतर टीममधल्या सहकाऱ्यांनी बराच वेळ सॅमसनसोबत चर्चा केली आणि त्याची तपासणीही झाली. सुदैवाने संजू सॅमसनला कोणतीही दुखापत झाली नाही.
Thanks for sharing this! 🙂 https://t.co/2r4e7cEdCm
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 30, 2020
संजू सॅमसनच्या या कॅचमुळे सोशल मीडियावर सचिनच्या 1992 सालच्या कॅचची अनेकांना आठवण झाली. त्यावेळीही सचिनने संजू सॅमसनसारखाच जबरदस्त कॅच घेतला होता. सचिन तेंडुलकरनेही या दोन्ही कॅचची तुलना करणारा व्हिडिओ रिट्विट केला आहे आणि व्हिडिओ शेयर करणाऱ्या चाहत्याचे आभारही मानले आहेत.
Also this one! 😉
— Vinod Kambli (@vinodkambli349) September 30, 2020
One of my favouriteshttps://t.co/KITlbMI4hg
दुसरीकडे सचिनच्या या ट्विटवर विनोद कांबळी (Vinod Kambli)नेही रिप्लाय दिला आहे. विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरने पकडलेल्या आणखी एका कॅचचा व्हिडिओ कमेंटमध्ये शेयर केला आहे. हा माझा आवडता कॅच असल्याचं कांबळी सचिनला म्हणाला. या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला आलेल्या कोलकात्याला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 174 रन करता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 9 विकेट गमावून 137 रन केले. राजस्थानचा या मोसमातला हा पहिलाच पराभव होता. या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येक टीम 3-3 मॅच खेळली आहे, तसंच प्रत्येक जण किमान एक तरी मॅच हरला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली, कोलकाता, राजस्थान, बैंगलोर, पंजाब, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई अशा 1 ते 8 क्रमांकावर आहेत.

)







