जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Aus- या कारणांमुळे पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव पक्का

Ind vs Aus- या कारणांमुळे पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव पक्का

फोटो सौजन्य- ट्विटर

फोटो सौजन्य- ट्विटर

ऑस्ट्रेलियामध्ये चौथ्या सत्रात धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला शेवटचं यश २००३ मध्ये मिळालं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २४३ धावा करुन भारताला २८६ धावांचं लक्ष्य दिलं आहे. चौथ्या सत्रात पर्थच्या खेळपट्टीवर धावा करणं सोपं नाही. अशात टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं जवळपास अशक्य असणार आहे. तसेच जुन्या आकड्यांवर नजर टाकली आणि सध्याचा भारतीय संघ पाहिला तर हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला जिवाचं रान करावं लागणार आहे. चौथ्या सत्राचा त्रास- ऑस्ट्रेलियामध्ये चौथ्या सत्रात धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला शेवटचं यश २००३ मध्ये मिळालं होतं. भारताने एडिलेड मैदानावर २३० धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला हरवले होते. भारतीय संघाने परदेशात २०० हून जास्त धावांचं लक्ष्य २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध पार केलं होतं. टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्त्वाखाली २५७ धावांचं लक्ष्य पूर्ण केलं होतं. गेल्या ५ वर्षांबद्दल बोलायचे झाले तर, भारताने २०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग एकदाही केलेला नाही. भारताला १२ पैकी आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर चार सामने अनिर्णित राहिले. परदेशात जेव्हा टीम इंडियाने २००+ धावांचा पाठलाग केला- विरुद्ध                   टारगेट          वर्ष  वेस्टइंडीज             ४०३             १९७६ श्रीलंका                  २६४            २००१ श्रीलंका                  २५७            २०१० ऑस्ट्रेलिया              २३०            २००३ न्युझीलँड                २००            १९६८ चौथ्या डावार खराब खेळ चौथ्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे. विराट कोहली सोडल्यास कोणताही खेळाडू चौथ्या डावात फार काळ तग धरु शकलेला नाही. चौथ्या डावात विराट ५१.७० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर चौथ्या डावातील अजिंक्य रहाणेची सरासरी ३४ टक्के आहे. भारताची भिंत म्हटल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराची सरासरीही फक्त २९.०६ एवढीच आहे. याशिवाय चौथ्या डावात सलामीवीर जोडीची हालत याहून खराब आहे. स्पिनरची कमतरता ऑस्ट्रेलियाच्या ऑफ स्पिनर नाथन लायनने या सामन्यात आतापर्यंत ५ गडी बाद केले. मात्र टीम इंडियाकडे या सामन्यासाठी रेग्युलर स्पिनरची कमतरता आहे. विराटने पहिल्या डावात हनुमा विहारीला वापरले. जर रविंद्र जडेजा संघात असता तर ऑस्ट्रेलियासाठी धावा करणं सोपं झालं नसतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात