लंडन, 15 जुलै : भारतीय महिला क्रिकेट टीमचा (Indian Women Cricket Team) इंग्लंड विरुद्ध लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधील दोन्ही मालिकांमध्ये पराभव झाला आहे. या पराभवानंतर कोच रमेश पोवारने (Ramesh Powar) प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवानंतर पोवर यांनी टीमच्या विचारात बदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं असून काही बदल करण्याचे संकेत दिले आहे. इंग्लंड विरुद्धच्या वन-डे मालिकेत कॅप्टन मिताली राजचा (Mithali Raja) अपवाद वगळता अन्य बॅटरला संघर्ष करावा लागला. मितालीचा स्ट्राईक रेट देखील फार प्रभावी नव्हता. त्यामुळे पोवार यांनी या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी काही नव्या खेळाडूंचा समावेश मिडल ऑर्डरमध्ये करण्याची गरज व्यक्त केली आहे. ‘मितालीनं चांगली बॅटींग केली आहे. पण तिला आणखी किमान एकीनं चांगली साथ देण्याची गरज आगे. पॉवर प्ले नंतरच्या ओव्हर्समध्ये विरोधी टीमवर दबाव आणणे आवश्यक आहे. याबाबत टीमची विचार करण्याची पद्धक बदलण्याची गरज आहे. ते एका रात्रीमध्ये होणार नाही,’ असे पोवारने मान्य केले. टीममध्ये बदल करण्याचे दोन मार्ग आहेत, असे पोवारने स्पष्ट केले. ‘पहिला मार्ग म्हणजे त्यांना (वर्तमान खेळाडू) बदलावं लागेल किंवा नव्या खेळाडूंना टीममध्ये संधी द्यायला हवी. याबाबत आम्ही काही प्रयोग केले पण ते यशस्वी झाले नाही. भविष्यात आम्ही आणखी काही नवे प्रयोग करु शकतो. नव्या खेळाडूंना संधी देऊ शकतो.’ असा खुलासा पोवारने केला आहे. IND vs SL: one-day मालिकेपूर्वी श्रीलंकेला आणखी एक धक्का, आता आक्रमक खेळाडू जखमी ‘अन्य बॉलर्सची साथ हवी’ न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपपर्यंत आम्ही सर्व पर्यांयाचा वापर करणार आहोत. झुलन गोस्वामीचा अपवाद वगळता अन्य फास्ट बॉलर्सची कामगिरी पाहून निराश झाल्याचं पोवारने सांगितले. वर्ल्ड कपपर्यंत मिडल ऑर्डर तयार झाली पाहिजे. टीमला 250 रन नक्की बनवून देईल अशी मिडल ऑर्डर आम्हाला तयार करावी लागेल. याबाबत कर्णधार, उपकर्णधार आणि निवड समितीच्या सदस्यांशी चर्चा करणार असल्याचं त्याने सांगितले. आमची फास्ट बॉलिंग ही झुलन गोस्वामीवर अवलंबून आहे. तिला अन्य बॉलर्सनी साथ द्यायला हवी, असे पोवारने सांगितले. शेवटच्या दोन टी20 सामन्यातील हरमनप्रीत कौरच्या खेळावर त्याने समाधान व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







