जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL: one-day मालिकेपूर्वी श्रीलंकेला आणखी एक धक्का, आता आक्रमक खेळाडू जखमी

IND vs SL: one-day मालिकेपूर्वी श्रीलंकेला आणखी एक धक्का, आता आक्रमक खेळाडू जखमी

IND vs SL: one-day मालिकेपूर्वी श्रीलंकेला आणखी एक धक्का, आता आक्रमक खेळाडू जखमी

मुंबई, 15 जुलै: भारताची विरुद्ध वन-डे सीरिज सुरू होण्यापूर्वी (India vs Sri Lanka ODI Series) श्रीलंकेच्या अडचणी सतत वाढत आहेत. श्रीलंकेचे प्रमुख खेळाडू आणि बोर्ड यांच्यात पगाराच्या मुद्द्यावर वाद सुरु आहे. या वादामुळे काही खेळाडू कँप सोडून गेले होते. माजी कॅप्टननं निवृत्त होण्याचा इशारा दिला. इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या सपोर्ट स्टाफमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण मालिका पुढे ढकलावी लागली. आता श्रीलंकेचा आक्रमक बॅट्समन जखमी झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेला नवा धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जुलै: भारताची विरुद्ध वन-डे सीरिज सुरू होण्यापूर्वी (India vs Sri Lanka ODI Series) श्रीलंकेच्या अडचणी सतत वाढत आहेत. श्रीलंकेचे प्रमुख खेळाडू आणि बोर्ड यांच्यात पगाराच्या मुद्द्यावर वाद सुरु आहे. या वादामुळे काही खेळाडू कँप सोडून गेले होते.  माजी कॅप्टननं निवृत्त होण्याचा इशारा दिला. इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या सपोर्ट स्टाफमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण मालिका पुढे ढकलावी लागली. आता श्रीलंकेचा आक्रमक बॅट्समन जखमी झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेला नवा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा अनुभवी बॅट्समन कुशल परेरा (Kusal Perera) जखमी झाल्याचं वृत्त ‘न्यूजवायर’ नं दिलं आहे. परेराच्या खांद्याला दुखापत झाली असून त्याचे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणे अनिश्चित आहे. परेराची काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या वन-डे आणि टी20 टीमची कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर त्याच्या कर्णधारपदावरही टांगती तलवार आहे. ‘हा’ होणार कॅप्टन श्रीलंकेच्या माध्यमांनी यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार ऑल राऊंडर दासून शनाकाला (Dasun Shanaka) या सीरिजसाठी कॅप्टन करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. शनाका हा नव्या करारपद्धतीवर स्वाक्षरी करणारा पहिला खेळाडू होता. 29 वर्षाचा शनाका आक्रमक बॅट्समन आणि फास्ट बॉलर आहे. तो गेल्या चार वर्षातील श्रीलंकेचा सहावा कॅप्टन असेल. यापूर्वी दिनेश चंदिमल, अँजलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा, दिमूथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी श्रीलंकेचं नेतृत्तव केलं आहे. शनाकाने यापूर्वी 2019 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 3 टी20 मॅचमध्ये कॅप्टनसी सांभाळली होती. ती मालिका श्रीलंकेनं 3-0 अशी जिंकली होती. ऋषभ पंतला Euro कप पडला महागात! वाचा, टीम इंडियातील कोरोना शिरकावाची Inside Story श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडेमधली पहिली वनडे 18 जुलैला खेळेल. तर 25 जुलैपासून तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. सीरिजच्या सगळ्या मॅच कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्य खेळवल्या जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात