मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women's World Cup पूर्वी चांगली बातमी, भारतानं केला न्यूझीलंडचा पराभव

Women's World Cup पूर्वी चांगली बातमी, भारतानं केला न्यूझीलंडचा पराभव

India vs New Zealand Women: भारतीय महिला क्रिकेट टीमनं (India Women Cricket Team) न्यूझीलंड विरूद्धच्या वन-डे सीरिजमध्ये व्हाईट वॉशची नामुश्की टाळली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 फेब्रुवारी : भारतीय महिला क्रिकेट टीमनं (India Women Cricket Team) न्यूझीलंड विरूद्धच्या वन-डे सीरिजमध्ये व्हाईट वॉशची नामुश्की टाळली आहे. पाचव्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडचा (India women vs New Zealand women) 24 बॉल आणि 6 विकेट्स राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दिलेलं 252 रनचं टार्गेट टीम इंडियानं 46 ओव्हरमध्ये आणि 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंड दौऱ्यातील भारताचा हा पहिलाच विजय आहे. या दौऱ्यातील एकमेव टी20 आणि नंतरच्या 4 वन-डे मॅचमध्ये भारतीय टीम पराभूत झाली होती.

आगामी महिला वर्ल्ड कपपूर्वी  (Women’s World Cup) प्रमुख खेळाडूंनी अर्धशतक झळकावल्यानं टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. दुसऱ्यांदा बॅटींगसाठी उतरलेल्या भारतीय टीमची सुरूवात खराब झाली. शफला वर्मा (Shafali Verma) 9 रन काढून आऊट झाली. त्यानंतर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 60 रनची भागिदारी केली. दीप्ती 21 रनवर आऊट झाली.

दीप्ती आऊट झाल्यानंतर स्मृतीला हरमनप्रीत कौरची (Harmanpreet Kaur) साथ मिळाली. या सीरिजमध्ये फार कमाल करू न शकलेल्या हरमननं शेवटच्या मॅचमध्ये दमदार खेळ केला. स्मृती-हरमन जोडीनं टीम इंडियाचा स्कोअर 150 च्या पुढे नेला. स्मृतीनं 71 रन काढले.

IND vs SL: रोहित शर्मा होणार T20 चा किंग! पहिल्याच मॅचमध्ये टाकणार सर्वांना मागं

हरमननं 66 बॉलमध्ये 6 फोर आणि एक सिक्सच्या मदतीनं 63 रन काढले. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी हरमनची ही खेळी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. हरमननं कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) सोबत चौथ्या विकेटसाठी 72 रनची भागिदारी केली. त्यानंतर अनुभवी मिताली राजनं तरूण विकेट किपर ऋचा घोषच्या मदतीनं टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मितालीनंच विजयी फोर लगावला. तिने 66 बॉलमध्ये नाबाद 57 रन काढले. तर चौथ्या वन-डेमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड करणारी रिचानं 8 बॉलमध्ये नाबाद 7 रन काढले.

First published:

Tags: Cricket news, India, Mithali raj, New zealand