ब्रिस्टल, 18 जून : भारतीय महिला टीमची ओपनर शफाली वर्मानं (Shafali Verma) टेस्ट क्रिकेटमधील पदार्पणातच दमदार खेळी केली. इंग्लंड विरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये शफालीनं टीम इंडियाला भक्कम सुरुवात करुन देत अर्धशतक झळकावले. पण, पदार्पणातील टेस्टमध्ये शतक झळकावण्यासाठी तिला फक्त चार रन कमी पडले. शेफालीसह स्मृती मंधानानं Smriti Mandhana) देखील अर्धशतक झळकावले. या दोघी आऊट होताच टीम इंडियाची पहिली इनिंग गडगडली. शफालीचा रेकॉर्ड शफाली वर्मा ही पहिल्याच टेस्टमध्ये भारताकडून सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावणारी ओपनर बनली आहे. हा महिलांप्रमाणेच पुरुषांच्या क्रिकेटमधील देखील रेकॉर्ड आहे. शफालीनं 17 वर्ष 140 दिवसांची असताना हा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड शफालीची ब्रिस्टल टेस्टमधील जोडीदार स्मृती मंधानाच्या नावावर होता. स्मृतीनं 2014 साली इंग्लंड विरुद्धच 18 वर्ष 28 दिवस वय असताना अर्धशतक झळकावले होते. शफाली-स्मृती जोडीनं पहिल्या विकेटसाठी 167 रनची पार्टरनरशिप केली. या जोडीनं इंग्लंडच्या 9 आऊट 396 रनचा आत्मविश्वासाने पाठलाग सुरु केला होता. शतकाच्या दिशेनं सुरु असलेली शफालीची वाटचाल केट क्रॉसनं रोखली. तिने 96 रनवर शफालीला आऊट केले. शफालीनं 96 रन 13 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केले. शफालीची भावुक प्रतिक्रिया शफाली वर्माचं शतक फक्त 4 रननं हुकल्यानं संपूर्ण देश हळहळला. शफाली वर्मानं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर या खेळीवर ट्विट केलं आहे. “माझ्यापेक्षा माझे वडील, कुटुंबीय, माझी असोसिएशन, माझी टीम, आणि अकादमी हे 4 रन जास्त मिस करणार आहे. मी त्याची लवकरच भरपाई करेन. या सर्वांनी मला मोठा पाठिंबा दिला आहे.” असे भावुक ट्विट शफालीनं केलं आहे.
I know my father, my family, my Association, my team and academy will miss those 4+ runs more than me but I will make it up to them on other occasions 😁. They have all been a huge support!
— Shafali Verma (@TheShafaliVerma) June 17, 2021
WTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी टीम इंडिया गडगडली शफाली वर्मा आऊट होताच टीम इंडियाची इनिंग गडगडली. टीम इंडियाची अवस्था बिनबाद 167 वरुन 5 आऊट 187 अशी झाली आहे. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये अजून 209 रननं पिछाडीनवर आहे. आता भारतीय महिला टीमची सर्व भिस्त दुसऱ्या दिवसाच्याअखेरीस 4 रनवर नाबाद असलेल्या अनुभवी हरमनप्रीत कौरवर आहे.

)







