Home /News /sport /

IND W vs AUS W: स्मृती मंधानाची ऐतिहासिक खेळी, भारतीय क्रिकेटला मिळाली 'Goddess of the offside'

IND W vs AUS W: स्मृती मंधानाची ऐतिहासिक खेळी, भारतीय क्रिकेटला मिळाली 'Goddess of the offside'

भारतीय महिला क्रिकेटमध्ये आजचा दिवस खास ठरला आहे. भारताची आक्रमक बॅटर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट टेस्टमध्ये (India Women vs Australia Women day night test) शतक झळकावलं.

    मुंबई, 1 ऑक्टोबर : भारतीय महिला क्रिकेटमध्ये आजचा दिवस खास ठरला आहे. भारताची आक्रमक बॅटर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट टेस्टमध्ये (India Women vs Australia Women day night test) शतक झळकावलं आहे. डे-नाईट टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. स्मृतीनं एलिसा पेरीच्या बॉलवर फोर लगावत तिचं टेस्ट क्रिकेटमधील पहिलं शतक पूर्ण केलं. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्टमधील पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आला होता. त्यामुळे स्मृतीला शतक झळकावण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. तिनं दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात फार वेळ वाया न घालवता शतक पूर्ण केलं. अखेर 127 रन काढून ती आऊट झाली. या खेळीत तिनं 22 फोर आणि 1 सिक्स लगावला. डाव्या हातानं बॅटींग करणाऱ्या स्मृतीनं 'ऑफ साईड'ला मुक्त हस्ते फटक्यांची उधळण केली. तिचा हा खेळ पाहून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर (Wasim Jaffer) यानं स्मृतीचं वर्णन 'The Goddess of the offside' म्हणजेच ऑफ साईडची देवी असं केलं आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) देखील ऑफ साईडला फटकेबाजीसाठी ओळखला जात असे. त्यामुळे गांगुलीचे वर्णन 'The God of the offside' असं केलं जातं. जाफरनं तोच धागा पकडत स्मृतीला नवं नाव दिलं आहे. आक्रमक बॅटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृतीची ही चौथीच टेस्ट आहे. तिनं यापूर्वी इंग्लंड दौऱ्यात ब्रिस्टल टेस्टमध्ये 78 रनची खेळी केली होती. स्मृतीनं आजवर 62 वन-डेमध्ये जवळपास 42 च्या सरासरीनं 2377 रन काढले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 81 टी20 मॅचमध्ये 13 अर्धशतकासह 1901 रन काढले आहेत. या प्रकारातील तिचा स्ट्राईक रेट 121 आहे. स्मृती मंधानाचं दमदार शतक, ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिली भारतीय स्मृतीनं पहिल्या विकेटसाठी शफाली वर्मासोबत 93 रनची तर दुसऱ्या विकेटसाठी पूनम राऊत सोबत 102 रनची पार्टनरशिप केली. तिच्या शतकामुळेच भारतीय टीमनं 2 विकेट्सच्या मोबदल्यात 200 रनचा टप्पा पार केला. भारतीय महिला टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ही एकमेव टेस्ट आहे. यापूर्वी झालेली तीन वन-डे सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं 2-1 नं जिंकली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs Australia

    पुढील बातम्या