मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL: भारताविरुद्धच्या सीरिजपूर्वी श्रीलंकेच्या कॅप्टनची हकालपट्टी, ‘हा’ ऑल राऊंडर सांभाळणार जबाबदारी

IND vs SL: भारताविरुद्धच्या सीरिजपूर्वी श्रीलंकेच्या कॅप्टनची हकालपट्टी, ‘हा’ ऑल राऊंडर सांभाळणार जबाबदारी

भारताविरुद्ध होणाऱ्या वन-डे आणि टी20 सीरिजपूर्वी (IND vs SL) श्रीलंकेचा कॅप्टन कुशल परेराची (Kusal Perera) हकालपट्टी निश्चित आहे.

भारताविरुद्ध होणाऱ्या वन-डे आणि टी20 सीरिजपूर्वी (IND vs SL) श्रीलंकेचा कॅप्टन कुशल परेराची (Kusal Perera) हकालपट्टी निश्चित आहे.

भारताविरुद्ध होणाऱ्या वन-डे आणि टी20 सीरिजपूर्वी (IND vs SL) श्रीलंकेचा कॅप्टन कुशल परेराची (Kusal Perera) हकालपट्टी निश्चित आहे.

मुंबई, 9 जुलै : भारताविरुद्ध होणाऱ्या वन-डे आणि टी20 सीरिजपूर्वी (IND vs SL) श्रीलंकेचा कॅप्टन कुशल परेराची (Kusal Perera) हकालपट्टी निश्चित आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ऑल राऊंडर दासून शनाकाला (Dasun Shanaka) या सीरिजसाठी कॅप्टन करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. शनाका हा नव्या करारपद्धतीवर स्वाक्षरी करणारा पहिला खेळाडू होता.

29 वर्षाचा शनाका आक्रमक बॅट्समन आणि फास्ट बॉलर आहे. तो गेल्या चार वर्षातील श्रीलंकेचा सहावा कॅप्टन असेल. यापूर्वी दिनेश चंदिमल, अँजलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा, दिमूथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी श्रीलंकेचं नेतृत्तव केलं आहे. शनाकाने यापूर्वी 2019 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 3 टी20 मॅचमध्ये कॅप्टनसी सांभाळली होती. ती मालिका श्रीलंकेनं 3-0 अशी जिंकली होती.

शनाकानं श्रीलंकेकडून आजवर 6 टेस्ट, 28 वन-डे आणि 43 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने टेस्टमध्ये 140, वन-डेमध्ये 611 तर टी20 मध्ये 543 रन काढले आहेत. त्याने या तीन्ही प्रकारात मिळून 34 विकेट्स घेतल्या आहेत.

श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाचा शिरकाव

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजवर कोरोनाचं संकट ओढावलं आहे, कारण श्रीलंकन टीममध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या श्रीलंका टीमचे बॅटिंग प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर (Grant Flower) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. इंग्लंडहून परतलेल्या श्रीलंका टीमच्या सगळ्या सदस्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचे रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

IND vs ENG : टीम इंडियात ओपनर निवडीचा वाद, गांगुलीने दिली पहिली प्रतिक्रिया

श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आता भारत-श्रीलंका सीरिज होणार का नाही? हा मोठा प्रश्न आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मात्र वनडे सीरिज वेळेत सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka