मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL: टीम इंडियाला धक्का, आणखी एक खेळाडू मालिकेतून आऊट!

IND vs SL: टीम इंडियाला धक्का, आणखी एक खेळाडू मालिकेतून आऊट!

दुसऱ्या टी20 पूर्वी कृणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे त्याच्या संपर्कातले 9 खेळाडू या मालिकेतून आऊट झाले. आता त्यापाठोपाठ टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.

दुसऱ्या टी20 पूर्वी कृणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे त्याच्या संपर्कातले 9 खेळाडू या मालिकेतून आऊट झाले. आता त्यापाठोपाठ टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.

दुसऱ्या टी20 पूर्वी कृणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे त्याच्या संपर्कातले 9 खेळाडू या मालिकेतून आऊट झाले. आता त्यापाठोपाठ टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.

कोलंबो, 29 जुलै: श्रीलंका विरुद्धच्या T20 सीरिजमध्ये टीम इंडियानं पहिली मॅच जिंकली. त्यानंतर सर्व गोष्टी भारतीय टीमसाठी प्रतिकूल ठरत आहेत. दुसऱ्या टी20 पूर्वी कृणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे त्याच्या संपर्कातले 9 खेळाडू या मालिकेतून आऊट झाले. आता त्यापाठोपाठ टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात नवदीप सैनीच्या (Navdeep Saini) खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मॅचमध्ये एकही ओव्हर बॉलिंग देण्यात आली नाही. टीम इंडियाचे बॉलुंग कोच पारस म्हांब्रे यांनी सैनीच्या दुखापतीबद्दल सैनी (Navdeep Saini Injury) ताजी माहिती दिली आहे.

‘सैनीवर आमच्या मेडिकल टीमचं लक्ष आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबबत योग्य निर्णय घेणार आहोत,’ असे म्हांब्रे यांनी सांगितले. मात्र सैनी ज्या पद्धतीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना मैदानावर पडला ते पाहाता तो शेवटच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

10 वा खेळाडू बाहेर!

सैनीला झालेली दुखापत गंभीर असेल तर तो टी20 मालिकेतून बाहेर होणारा 10 वा खेळाडू असेल. यापूर्वी कृणाल पांड्या, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौतम, मनिष पांडे, इशान किशन, युजवेंद्र चहल आणि दीपक चहर हे नऊ खेळाडू या मालिकेतून आऊट झाले आहेत. कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Tokyo Olympics, Badminton: क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या Yamaguchi शी सिंधूची लढत, पदकाची आशा कायम

सैनीचा पर्याय कोण?

टीम इंडियानं मंगळवारी 5 नेट बॉलर्सचा टीममध्ये समावेश केला आहे. यामध्ये 4 फास्ट बॉलर आहेत. सैनी खेळला नाही तर त्याच्या जागी स्पिनरला देखील संधी मिळून शकते. कारण, कोलंबोचे पिच स्पिन बॉलर्सना मदत करणारे आहे. त्या परिस्थितीमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) साई किशोरला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर अर्शदीप सिंह, संदीप वॉरियर, इशान परोळ आणि सिमरजीत सिंह हे चार फास्ट बॉलर्स देखील निवडीसाठी उपलब्ध आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket, India Vs Sri lanka