कोलंबो, 23 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यात पावसाचा अडथळा आला आहे. टीम इंडियाने 23 ओव्हरनंतर 3 आऊट 147 रन केले होते. त्यावेळी पावसामुळे खेळ थांबवावा लागला. या मालिकेत पहिल्यांदाच टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) टॉस जिंकला. धवननं टॉस जिंकताच तात्काळ बॅटींगचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. कॅप्टन धवन 13 रन काढून आऊट झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 रनची पार्टनरशिप केली. पृथ्वी शॉ यावेळी दुर्दैवी ठरला. त्याचे अर्धशतक फक्त 1 रननं हुकलं. संजू सॅमसनचंही वन-डे पदार्पणात अर्धशतक झळकावण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. तो 46 रन काढून आऊट झाला. पावसामुळे खेळ थांबवा त्यावेळी मनिष पांडे (10) तर सूर्यकुमार यादव 22 रन काढून खेळत होते.
Well, the rain has got heavier and the ground is fully covered #SLvIND pic.twitter.com/nr7ZbsJ5Jd
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 23, 2021
टीम इंडियात 6 बदल तिसऱ्या वन-डेपूर्वीच मालिका जिंकल्यानं टीम इंडियानं या सामन्यात एकूण 6 बदल केले. त्यापैकी 5 जण तर वन-डेमध्ये पदार्पण करत आहेत. संजू सॅमसन (Sanju Samson), नितीश राणा (Nitish Rana), के. गौतम (K. Gowtham), राहुल चहर (Rahul Chahar) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) या पाच जणांनी या वन-डेमध्ये पदार्पण केले आहे. त्याचबरोबर नवदीप सैनीलाही टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. IPL मधील नेट बॉलरचे टीम इंडियाकडून पदार्पण, क्रिकेटसाठी बूक स्टॉलवर केली नोकरी श्रीलंकेविरुद्धची दुसरी वन-डे जिंकलेल्या टीममधील इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या सहा जणांना या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. एकाच सामन्यात पाच जणांनी पदार्पण करण्याची ही 41 वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1980 साली मेलबर्नमध्ये झालेल्या वन-डे सामन्यात टीम इंडियामध्ये पाच जणांनी पदार्पण केले होते.