Home /News /sport /

IND vs SL : टीम इंडियाची शक्ती होणार दुप्पट, डे-नाईट टेस्टमध्ये मॅच विनरची एन्ट्री!

IND vs SL : टीम इंडियाची शक्ती होणार दुप्पट, डे-नाईट टेस्टमध्ये मॅच विनरची एन्ट्री!

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजमधील दुसरी आणि शेवटची टेस्ट बेंगळुरूमध्ये आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाची शक्ती दुप्पट होणार आहे.

    मुंबई, 7 मार्च : टीम इंडियानं मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेवर (India vs Sri Lanka) दणदणीत विजय मिळवला आहे. रविंद्र जडेजाच्या ऑल राऊंड खेळामुळे भारतीय टीमनं मोहाली टेस्ट एक इनिंग आणि 222 रननं जिंकली.  या विजयाबरोबरच 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. आता सीरिजमधील दुसरी आणि शेवटची टेस्ट बेंगळुरूमध्ये होणार आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाची शक्ती दुप्पट होणार आहे. टीम इंडियाचा स्पिन बॉलर अक्षर पटेल (Axar Patel ) दुसरी टेस्ट खेळणार आहे, असं वृत्त आहे. 'क्रिकबझ' च्या रिपोर्टनुसार तो बेंगलुरू टेस्टसाठी उपलब्ध असेल. अक्षरला मागच्या महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे तो वेस्ट इंडिज आणि श्रीलंका विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये खेळला नव्हता. त्याचा पहिल्या टेस्टच्या टीममध्येही समावेश होता. पण, तो ही टेस्ट खेळणार नाही, असं निवड समितीनं स्पष्ट केलं होतं. आता त्याच्या फिटनेसच्या आधारावर बेंगलुरू टेस्टमध्ये त्याची निवड होऊ शकते. कोरोना व्हायरसमधून बरा झाल्यानंतर अक्षरनं बेंगलुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. तो टीममध्ये परतल्यास भारतीय स्पिन बॉलिंगची शक्ती आणखी वाढणार आहे. मोहाली टेस्टमध्ये टीम इंडिया तीन स्पिनर्ससह उतरली होती. अक्षरच्या अनुपस्थितीमध्ये जयंत यादवला संधी मिळाली. पण, त्याला एकही विकेट मिळाली नाही. Ranji Trophy 2022 : मुंबईचा मोठा विजय, फॅन्सना मिळाली 4 वर्षांनी Good News अक्षर पटेल गेल्या वर्षभरात भारतीय पिचवरील सर्वात मोठा मॅच विनर बॉलर ठरला आहे. त्यानं 5 टेस्टमध्ये 36 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरनं एका इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी 5 वेळा तर एका टेस्टमध्ये 10 विकेट्स घेण्याची कामगिरी 1 वेळा केली आहे. इंग्लंड विरूद्ध मागच्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये अक्षरनं 11 विकेट्स घेतल्या होत्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Axar patel, Cricket news, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या