जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ranji Trophy 2022 : मुंबईचा मोठा विजय, फॅन्सना मिळाली 4 वर्षांनी Good News

Ranji Trophy 2022 : मुंबईचा मोठा विजय, फॅन्सना मिळाली 4 वर्षांनी Good News

Ranji Trophy 2022 : मुंबईचा मोठा विजय, फॅन्सना मिळाली 4 वर्षांनी Good News

जवळपास 20 दिवस झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या (Ranji Trophy 2022) नॉक आऊट राऊंडमधील टीम निश्चित झाल्या आहेत. मुंबईच्या फॅन्ससी तब्बल 4 वर्षांनी Good News आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मार्च : जवळपास 20 दिवस झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या (Ranji Trophy 2022) नॉक आऊट राऊंडमधील टीम निश्चित झाल्या आहेत. 17 फेब्रुवारीपासून रणजी स्पर्धा सुरू झाली होती. रविवारी तिसऱ्या फेरीचे सामने संपल्यानंतर टॉप 7 टीमनं थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या टीममध्ये मुंबई, बंगाल, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या टीमचा समावेश आहे. क्वार्टर फायनलमधील आठव्या जागेसाठी एलिट ग्रुपमध्ये सर्वात कमी पॉईंट्स मिळवणाऱ्या झारखंडला प्लेट ग्रुपमध्ये सर्वात जास्त पॉईंट्स कमावणाऱ्या नागालँडचा सामना करावा लागेल. पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या मुंबईसाठी ही स्पर्धा खास ठरली आहे. मुंबईनं तब्बल 4 वर्षांनंतर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईनं एलिट डी ग्रुपमधील शेवटच्या मॅचमध्ये ओडिशावर एक इनिंग आणि 108 रननं मोठा विजय मिळवला. पहिल्या इनिंगमध्ये 248 रननं पिछाडीवर पडलेल्या ओडिशाची दुसरी इनिंग फक्त 140 रनवर आटोपली. मुंबईकडून शम्स मुलानी (64 रनमध्ये 5 विकेट्स) आणि तनूष कोटियान (31 रन देऊन 3 विकेट्स) हे यशस्वी बॉलर ठरले. त्यांच्या भेदक माऱ्यापुढे ओडिशाची टीम शेवटच्या दिवशी 15 ओव्हर्सपूर्वीच ऑल आऊट झाली. मुंबईच्या मुलानीनं या स्पर्धेतील 3 मॅचमध्ये सर्वाधिक 29 विकेट्स घेतल्या आहेत. महाराष्ट्राची निराशा ग्रुप जीमध्ये उत्तर प्रदेशनं मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत महाराष्ट्रावर थरारक विजय मिळवला. या विजयासह उत्तर प्रदेशनं नॉक आऊट राऊंडमध्ये प्रवेश केला. पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्रानं दुसरी इनिंग 5 आऊट 211 रनवर घोषित केली. राहुल त्रिपाठीनं 110 बॉलमध्ये 17 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं नाबाद 123 रन केले. उत्तर प्रदेशला विजयासाठी 357 रनचे टार्गेट होते. ते त्यांनी असमास शौकत (100) आणि कॅप्टन करन शर्मा (116) यांच्या जोरावर पूर्ण केले. रिंकू सिंहनं 60 बॉलमध्ये 78 रनची आक्रमक खेळी करत टीम विजयात मोलाची भूमिका बजावली. IPL Schedule 2022 : CSK vs KKR सामन्याने आयपीएलला सुरूवात, असं आहे संपूर्ण वेळापत्रक कोरोना व्हायरसमुळे यंदा रणजी ट्रॉफी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होई शकली नाही. यावर्षी ही स्पर्धा दोन टप्प्यात होत आहे. स्पर्धेचा दुसरा टप्पा म्हणजेच नॉक आऊट राऊंड आयपीएल स्पर्धेनंतर सुरू होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात