मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : द्रविडचा सल्ला ठरला चहरसाठी ठरला निर्णायक, श्रीलंकेच्या तोंडातून पळवला विजयाचा घास

IND vs SL : द्रविडचा सल्ला ठरला चहरसाठी ठरला निर्णायक, श्रीलंकेच्या तोंडातून पळवला विजयाचा घास

दीपक चहरनं (Deepak Chahar) नाबाद अर्धशतक झळकावत श्रीलंकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला. टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा सल्ला या खेळीमध्ये निर्णायक ठरला, असा खुलासा चहरनं मॅच संपल्यानंतर केला आहे.

कोलंबो, 21 जुलै : टीम इंडियानं दुसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 3 विकेट्सनं पराभव केला. श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 50 ओव्हर्समध्ये 275 रन केले होते. भारतीय टीमनं हे आव्हान 5 बॉल आणि 3 विकेट्स राखून पूर्ण केलं. या मॅचमध्ये टीम इंडियाची अवस्था 6 आऊट 160 झाली होती. त्यानंतर दीपक चहरनं (Deepak Chahar) नाबाद अर्धशतक झळकावत श्रीलंकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला. टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा सल्ला या खेळीमध्ये निर्णायक ठरला, असा खुलासा चहरनं मॅच संपल्यानंतर केला आहे.

चहरनं सांगितलं की, ‘राहुल सरांनी मला सर्व बॉल खेळण्याचा सल्ला दिला होता. मी 'इंडिया ए' कडून काही चांगल्या खेळी खेळल्या होत्या. त्यामुळे मी मॅचचं चित्र पालटवू शकतो, असा मला विश्वास होता. राहुल द्रविडचा माझ्यावर विश्वास होता. त्यांनीच मी या परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी योग्य खेळाडू असल्याचं सांगितलं होतं.’ असा खुलासा दीपकनं केला आहे.

या प्रकारची खेळी खेळणे हे माझे स्वप्न होते,असेही दीपकने यावेळी सांगितले. ‘प्रत्येक क्रिकेटपटूचं आपल्या देशासाठी या प्रकारची इनिंग खेळण्याचं स्वप्न होतं. मी बॅटींगसाठी उतरलो त्यावेळी देखील माझ्या मनात तोच विचार होता. मी पहिल्यांदा या प्रकारच्या परिस्थितीमध्ये बॅटींग केली. आम्ही प्रत्येक बॉलच्या हिशेबाने खेळत होतो. जिंकण्यासाछी 50 पेक्षा कमी रन शिल्लक राहिले तेव्हा मी फटकेबाजी केली. 43 व्या ओव्हरमध्ये संदाकनच्या बॉलवर सिक्स लगावल्यानंतर मला लय सापडली.’ असा अनुभव दीपकनं सांगितला आहे.

चहरची बॅटींग पाहून सेहवागला आठवला 'धोनी', राहुल द्रविडबद्दल म्हणाला...

दीपक चहरने 82 बॉलमध्ये नाबाद 69 रनची खेळी केली, तर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) 28 बॉलमध्ये नाबाद 19 रन केले.  हा सामना श्रीलंका जिंकेल असं वाटत होतं, पण दीपक चहरने श्रीलंकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. भुवनेश्वर कुमारनेही चहरला चांगली साथ दिली.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid