IND vs SL : चहरची बॅटींग पाहून सेहवागला आठवला 'धोनी', राहुल द्रविडबद्दल म्हणाला...

टीम इंडियाचा माजी कॅप्टन वीरेंद्र सेहवागनं (Vireendra Sehwag) या मॅचनंतर एक मजेदार ट्विट केलं आहे. सेहवागनं द्रविड आणि चहरबद्दल ट्विट करताना धोनीचा (MS Dhoni) आधार घेतला आहे.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन वीरेंद्र सेहवागनं (Vireendra Sehwag) या मॅचनंतर एक मजेदार ट्विट केलं आहे. सेहवागनं द्रविड आणि चहरबद्दल ट्विट करताना धोनीचा (MS Dhoni) आधार घेतला आहे.

  • Share this:
    मुंबई, 21 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेमध्ये (India vs Sri Lanka) टीम इंडियानं 3 विकेट्सनं थरारक विजय मिळवला आहे. या दौऱ्यात शिखर धवनच्या कॅप्टनसीमध्ये नव्या खेळाडूंची टीम बीससीसआयनं उतरवली आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) या टीमचा कोच आहे. श्रीलंका दौऱ्यावर येण्यापूर्वी या टीमची B टीम म्हणून हेटाळणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष मैदानात द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टीमनं जोरदार खेळ करत दुसऱ्याच वन-डेमध्ये मालिका जिंकली आहे. टीम इंडियानं मंगळवारी मिळवलेल्या विजयाचा दीपक चहर (Deepak Chahar) हा हिरो होता. चहरनं 82 बॉलमध्ये नाबाद 69 रनची खेळी केली. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली चहर यापूर्वी इंडिया A कडून खेळला आहे.  चहर चांगली बॅटींग करु शकतो असा विश्वास कोच द्रविडला होता. त्यामुळे द्रविडने चहरला सातव्या क्रमांकावर बॅटींगची संधी दिली. चहरनंही द्रविडचा  विश्वास सार्थ ठरवला. टीम इंडियाचा माजी कॅप्टन वीरेंद्र सेहवागनं (Vireendra Sehwag) या मॅचनंतर एक मजेदार ट्विट केलं आहे. सेहवागनं द्रविड आणि चहरबद्दल ट्विट करताना महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) बायोपिकमधील प्रसंगाचा आधार घेतला आहे. धोनीचा खेळ पाहून त्याच्या कोचचं मन भरुन येतं. हा तो प्रसंग आहे. सेहवागनं त्याच प्रसंगाचा फोटो वापरत हे ट्विट केलं असून ते आता चांगलंच व्हायरल झालं आहे. पृथ्वीबद्दलही दिली होती प्रतिक्रिया वीरेंद्र सेहवाग त्याच्या मजेदार ट्विट्ससाठी प्रसिद्ध आहे. पहिल्या वन-डे नंतर 'मॅन ऑफ द मॅच' पृथ्वी शॉबद्दलही सेहवागनं असंच एक गंमतीशीर ट्विट केले होते.  पृथ्वी शॉच्या खेळामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा यांची आठवण येते, असं वक्तव्य टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केले होते. सेहवागने रविवारी हाच मुद्दा पकडत ट्विट केले होते. T20 मधील नामुश्कीनंतर ऑस्ट्रेलियाचे कमबॅक, वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय सेहवागनं त्याचा सचिन आणि लारासह असलेला फोटो शेअर करत 'पहिल्या 5.3 ओव्हर्स आमचा जलवा होता.' असं ट्विट केलं. त्याचं ते ट्विट देखील चांगलंच व्हायरल झाले होते.
    Published by:News18 Desk
    First published: