मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL: राहुल द्रविड झाला होता शेवटच्या क्षणी नर्व्हस, चहरला पाठवला खास मेसेज

IND vs SL: राहुल द्रविड झाला होता शेवटच्या क्षणी नर्व्हस, चहरला पाठवला खास मेसेज

शेवटच्या काही ओव्हरमध्ये मॅचचं पारडं समान होतं. हा ओव्हरचा थरार सुरू असताना टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) चांगलाच नर्व्हस झाला होता.

शेवटच्या काही ओव्हरमध्ये मॅचचं पारडं समान होतं. हा ओव्हरचा थरार सुरू असताना टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) चांगलाच नर्व्हस झाला होता.

शेवटच्या काही ओव्हरमध्ये मॅचचं पारडं समान होतं. हा ओव्हरचा थरार सुरू असताना टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) चांगलाच नर्व्हस झाला होता.

कोलंबो, 21 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरी वन-डे शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाली. दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 रनची भागिदारी करत टीम इंडियाला 3 विकेट्सनं विजय मिळवून दिला. शेवटच्या काही ओव्हरमध्ये मॅचचं पारडं समान होतं. भारताची एक विकेटही चित्र बदलवू शकली असती. शेवटच्या ओव्हरचा थरार सुरू असताना टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) चांगलाच नर्व्हस झाला होता.

द्रविडनं शेवटच्या टप्प्यात दीपक चहरसाठी त्याचा छोटा भाऊ राहुल चहरच्या (Rahul Chahar) माध्यमातून एक खास निरोप पाठवला होता. दीपकनंच याचा खुलासा मॅच संपल्यानंतर केला आहे. 'राहुल सरांनी मला शेवटपर्यंत खेळण्याचा सल्ला दिला होता. मी मॅच जिंकून देऊ शकतो हा त्यांना विश्वास होता. त्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. त्यांचा हा निरोप माझ्यासाठी गेम चेंजर ठरला.'असे चहरने सांगितले.

या प्रकारची खेळी खेळणे हे माझे स्वप्न होते,असेही दीपकने यावेळी सांगितले. ‘प्रत्येक क्रिकेटपटूचं आपल्या देशासाठी या प्रकारची इनिंग खेळण्याचं स्वप्न होतं. मी बॅटींगसाठी उतरलो त्यावेळी देखील माझ्या मनात तोच विचार होता. मी पहिल्यांदा या प्रकारच्या परिस्थितीमध्ये बॅटींग केली. आम्ही प्रत्येक बॉलच्या हिशेबाने खेळत होतो. जिंकण्यासाछी 50 पेक्षा कमी रन शिल्लक राहिले तेव्हा मी फटकेबाजी केली. असे चहरने सांगितले.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेचे कोच आणि कॅप्टन मैदानात भिडले, VIDEO VIRAL

नव्या इतिहासाची नोंद

या विजयासह टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजय मिळवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय टीमने केला आहे. भारताने श्रीलंकेचा एकूण 126 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पराभव केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने श्रीलंकेला 125 मॅचमध्ये धूळ चारली.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid