कोलंबो, 21 जुलै: टीम इंडियानं (Team India) दुसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेचा 3 विकेट्सनं पराभव करत वन-डे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या 276 रनचा पाठलाग करताना भारताची अवस्था 7 आऊट 193 झाली होती. त्यावेळी दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) या दोन प्रमुख बॉलर्सनी आठव्या विकेट्ससाठी 84 रनची नाबाद भागिदारी करत विजय खेचून आणला. चहरनं 69 रन तर भुवनेश्वरनं 19 रन काढले.
दुसऱ्या वन-डेवर बराच काळ श्रीलंकेचं वर्चस्व होते. चहर आणि भुवनेश्वरनं शेवटच्या क्षणी निर्णायक खेळ करत विजय खेचून आणला. श्रीलंकेच्या या निराशाजनक कामगिरीवर त्यांचे कोच मिकी आर्थर (Micky Arthur) चांगलेच नाराज झाले होते. शेवटच्या ओव्हरमधील बॉलिंग पाहून ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या आर्थर यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती.
दीपक चहरनं शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फोर लगावत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आर्थर यांनी भर मैदानात श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाका (Dasun Shanaka) याला सुनावले. शनाकानं देखील यावेळी त्यांना उत्तर दिलं. श्रीलंकेचे कोच आणि कॅप्टन यांच्या वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे.
— cric fun (@cric12222) July 20, 2021
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेने पहिल्यांदा बॅटींग करत 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 275 रन केले. आविष्का फर्नांडो (Avishka Fernando) आणि मिनोद भानुका (Minod Bhanuka) यांनी श्रीलंकेला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. 77 रनवर श्रीलंकेची पहिली विकेट गेली. मागच्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही श्रीलंकेच्या बॅट्समनना चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही.
'भावा, तू तर....', दीपक चहरच्या खेळीनंतर बहिणीची पोस्ट Viral
आविष्का फर्नांडोने 50 रन आणि चरिथ असलंकाने 65 रनची खेळी केली. चमिका करुणारत्ने 44 रनवर नाबाद राहिला. मिनोद भानुका 36 रनवर, धनंजया डि सिल्वा 32 रनवर आऊट झाले. भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर दीपक चहरला (Deepak Chahar) 2 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Video Viral On Social Media