मुंबई, 21 जुलै: टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहरसाठी (Deepak Chahar) मंगळवारची रात्र खास होती. श्रीलंकेनं दिलेल्या 276 रनचा पाठलाग करताना भारताची अवस्था 6 आऊट 160 अशी नाजूक होती, तेव्हा चहर बॅटींगला आला. चहरनं त्या अवघड परिस्थितीमध्ये नाबाद 69 रनची खेळी करत टीम इंडियाला सामना आणि मालिका जिंकून दिली. विशेष म्हणजे चहरचं वन-डे कारकिर्दीमधील हे पहिलंच अर्धशतक आहे. त्याच्या या खेळीनंतर दीपकची बहीण मालती चहरनं (Malti Chahar) इन्स्टाग्रामवर या खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 'भारतासाठी मॅच जिंकलीस आणि प्रत्येक भारतीयांचं ऱ्हदय जिंकलंस. तू स्टार आहेस. असाच चमकत राहा.' अशी प्रतिक्रिया मालतीनं दिली आहे. मालतीनं यावेळी दीपकनं लगावलेल्या विजयी फोरचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. मालतीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
मालती ही मॉडल असून तिने हिंदी आणि भोजपुरी सिनेमातही काम केलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान ती अनेकदा दीपक आणि राहुल या आपल्या भावांना सपोर्ट करण्यासाठी मैदानात उपस्थित असते. महेंद्रसिंह धोनी हा तिचा आवडता खेळाडू असून चेन्नई सुपर किंग्स ही आवडती टीम आहे. मालती साक्षी धोनीची देखील चाांगली मैत्रिण आहे. ती सोशल मीडियावर देखील सक्रीय आहे.
View this post on Instagram
दीपक चहरचा भाऊ आणि टीम इंडियाचा सदस्य राहुल चहर (Rahul Chahar) यानेही दीपकच्या खेळीनंतर आनंद व्यक्त केला आहे. श्रीलंका दौऱ्यातील टीममध्ये राहुलचा समावेश आहे. त्याला पहिल्या दोन वन-डेमध्ये संधी मिळाली नाही. मंगळवारी दीपकनं विजयी फोर लगावताच राहुलं त्याची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला.
'माझ्या भावा तू आज करुन दाखवलंस. फक्त आपले कुटुंबीय नाही, तर संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे.' असं ट्विट राहुलनं दीपकसोबतचा फोटो शेअर करत केलं आहे.
My Brother you killed it today 🔥 Not just our family but the entire nation is proud of you today 🇮🇳 #INDvSL pic.twitter.com/sOFwqdN5DH
— Rahul Chahar (@rdchahar1) July 20, 2021
द्रविडचा सल्ला ठरला चहरसाठी ठरला निर्णायक, श्रीलंकेच्या तोंडातून पळवला विजयाचा घास
भारताने 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. दीपक चहरने 82 बॉलमध्ये नाबाद 69 रनची खेळी केली, तर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) 28 बॉलमध्ये नाबाद 19 रन केले. श्रीलंकेने ठेवलेल्या 276 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 193/7 अशी झाली होती. तेव्हा हा सामना श्रीलंका जिंकेल असं वाटत होतं, पण दीपक चहरने श्रीलंकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. भुवनेश्वर कुमारनेही चहरला चांगली साथ दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.