मुंबई, 4 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील मोहाली टेस्टपासून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकिर्दीमधील नवा अध्याय सुरू झाला आहे. रोहित शर्मा मोहालीमध्ये पहिल्यांदाच टेस्ट टीमची कॅप्टनसी करतोय. रोहित भारतीय टेस्ट टीमचा 35 वा कॅप्टन आहे. तर क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात टीम इंडियाची कॅप्टनसी करणारा तो पाचवा खेळाडू आहे. मोहालीमध्ये त्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. रोहितनं बॅटींग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियानं आक्रमक सुरूवात केली. रोहित आणि मयंक अग्रवाल जोडीनं टीम इंडियाला ही सुरूवात करून दिली. रोहित मोठ्या ब्रेकनंतर टेस्ट क्रिकेट खेळत होता. पण, त्यामुळे येणारं कोणतंही अवघडलेपण त्याच्या खेळात दिसत नव्हतं. सहज फटकेबाजी करणाऱ्या रोहितनं अचानक एक मोठी चूक केली. त्याचा त्याला फटका बसला. रोहितची आक्रमक खेळी 28 बॉलमध्ये संपुष्टात आली. त्याला लाहिरू कुमारानं आऊट केले. रोहितनं शॉर्ट बॉलवर त्याचा आवडता पुल शॉट खेळताना चूक केली आणि विकेट गमावली. रोहित जगभरात पुल शॉटसाठी ओळखला जातो. तो शॉट खेळतानाच त्याने मोहालीत चूक केली. ते पाहून क्रिकेट फॅन्ससह रोहितचाही स्वत:वर विश्वास बसला नाही. पण, त्याच्यासमोर मान खाली घालून परत जाण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. कुमारानं रोहितला जाळ्यात अडकवलं.
Big wicket for Sri Lanka ☝️
— ICC (@ICC) March 4, 2022
Rohit Sharma (29) pulls one straight to the fielder at fine leg. India are 53/1 after 10 overs.#WTC23 | #INDvSL | https://t.co/mo5BSRmFq2 pic.twitter.com/ehLPSdtnc7
रोहितनं मोहाली टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 28 बॉलमध्ये 29 रन काढले. त्यामध्ये त्यानं 6 फोर लगावले. तसंच त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त होता. त्याला चांगली सुरूवात मिळाली होती. पण, त्यानंतर आणखी आक्रमक खेळण्याच्या नादात त्यानं विकेट गमावली. रोहित प्रमाणेच त्याचा ओपनिंग पार्टनर मयंक अग्रवाललाही चांगल्या सुरूवातीतचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयश आले. तो 33 रन काढून आऊट झाला. IND vs SL : विराट कोहलीनं पहिल्याच बॉलवर चुकवला फॅन्सच्या काळजाचा ठोका टीम इंडिया या टेस्टमध्ये मोठ्या कालावधीनंतर चेतेश्वर पुजारा (Chteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या अनुभवी खेळाडूंच्याशिवाय उतरली आहे. पुजाराच्या जागी हनुमा विहारी तर अजिंक्यच्या जागी श्रेयस अय्यरचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.