मुंबई, 2 डिसेंबर : सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय टीम सध्या जोहान्सबर्गमध्ये आहे. येथील हॉटेलात सर्वांनी एकत्र नव्या वर्षाचे स्वागत (New Year 2022) केले. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid), कॅप्टन विराट कोहलीसह (Virat Kohli) सर्व सदस्य या पार्टीत सहभागी झाले होते. टीम इंडियाचा बॅटर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हॉटेल स्टाफसोबत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी डान्स करत आहेत.
श्रेयस आणि सिराजचा हा डान्स व्हिडीओ फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. यापूर्वी सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचे हॉटेलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी देखील सिराज अश्विन आणि पुजारासह स्टाफ सोबत डान्स करताना दिसला होता. या सीरिजमधील तिसरी टेस्ट सोमवारपासून वाँडर्समध्ये सुरू होणार आहे. या मैदानात टीम इंडियानं आजवर पाच टेस्ट खेळल्या असून त्यामधील 2 टेस्ट जिंकल्या आहेत.
पहिल्या टेस्टमध्ये श्रेयस अय्यरला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती. श्रेयसनं न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये पदार्पणातील टेस्टमध्ये शतक झळकावले होते. टीम इंडियाचा अनुभवी बॅटर चेतेश्वर पुजारानं पहिल्या टेस्टमध्ये निराश केले. तर अजिंक्य रहाणेनं 48 आणि 20 रन काढले होते. या दोघांपैकी एकाला वगळून श्रेयसला संधी मिळणार का हे सोमवारीच स्पष्ट होईल. दुसरिकडे सिराज दुसऱ्या टेस्टमध्ये खेळणार हे नक्की आहे.
टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेत केले नववर्षाचे स्वागत, Photo शेअर करत विराट म्हणाला...
भारतीय क्रिकेट टीमनं दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. यंदा हा इतिहास बदलण्याची संधी टीम इंडियाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.