मुंबई, 10 जानेवारी : क्रिकेट साऊथ आफ्रिका (CSA) मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णानुसार बोर्डाशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) आगामी सिझनमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य द्यावे लागेल. पीएसएलचा आगामी सिझन 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा निर्णय जाहीर होताच पाकिस्तानी मीडियाने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय (BCCI) तसेच आयपीएलवर (IPL) टीका करण्यास सुरूवात केली आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील सर्व दिग्गज क्रिकेटपटू खेळतात. पण, पाकिस्तानी खेळाडूंना यामध्ये खेळण्यास बंदी आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे संचालक ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांनी दिलेल्या ‘क्रिकइन्फोला दिलेल्या माहितीनुसार. ‘आमच्या टीममधील करारबद्ध खेळाडूंना यापूर्वी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याची एनओसी (NOC) देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत स्पर्धेमुळे ती एनओसी रद्द करण्यात आली आहे. या क्रिकेटला नेहमी प्राथमिकता द्यायला हवी. आमचे वेळापत्रक आणि पीएसलचे वेळापत्रक वेगळे असेल तर आम्ही खेळाडूंना त्यामध्ये खेळण्यासाठी एनओसी देऊ.’ पाकिस्तानी मीडियाने यावर थयथयाट केला आहे. ‘आफ्रिका बोर्डाचे दुटप्पी धोरण यामधून स्पष्ट होते. ऑस्ट्रेलिया टीमनं 9 महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये जाण्यास बंदी केली होती. त्यावेळी पाकिस्तानने तिथे सीरिज खेळली. इतकेच नाही तर त्या सीरिजमधील पहिल्या 2 वन-डे नंतर दक्षिण आफ्रिका टीममधील महत्त्वाचे खेळाडू आयपीएल (IPL) खेळण्यासाठी भारतामध्ये रवाना झाले होते.’ याची आठवण त्यांनी करून दिली आहे. तिसऱ्या टेस्टच्या Playing 11 बाबत BCCI ने केला खुलासा, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी आयपीएलमध्ये एनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर सारखे प्रमुख खेळाडू सहभागी झाले होते. त्यावरून क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे दुर्लक्ष केले हे सिद्ध होते, असा आरोप पाकिस्तानच्या मीडियाने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.