सेंच्युरियन, 1 जानेवारी : टीम इंडियानं सेंच्युरियनमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test) दक्षिण आफ्रिकेचा पराभव (India vs South Africa) केला. सेंच्युरिनमध्ये भारतीय टीमचा हा पहिलाच विजय आहे. या विजयासह टीम इंडियानं सीरिजमध्ये 1-0 नं आघाडी घेतली आहे. भारतीय टीम मॅच संपल्यानंतर हॉटेलमध्ये परतली त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) हे देखील सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विराट प्रामुख्यानं नाचताना दिसत आहे, पण त्याचवेळी राहुल द्रविड देखील एका बाजूला थिरकत असल्याचं फॅन्सच्या नजरेतून सुटलेलं नाही.
.@imVkohli 🔥🕺pic.twitter.com/wPyUbzfPOt
— Virat Kohli Edits™ (@ViratKohliEdits) December 31, 2021
राहुल द्रविड हा कोच सारखा वागत नाही. तो टीममधील अन्य खेळाडूंप्रमाणे विजयाचा आनंद घेत आहे, ही भावना फॅन्सनी व्यक्त केली आहे.
आर. अश्विन (R. Ashwin), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तीन टेस्टच्या या सीरिजमधील पुढची टेस्ट तीन जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये सुरू होणार आहे. टीम इंडियानं आजवर दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. यंदा हा इतिहास बदलण्याची सुवर्णसंधी आहे.
NZ vs BAN: न्यूझीलंडची दमदार सुरूवात, कॉनवेनं झळकावली वर्षातील पहिली सेंच्युरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul dravid, Video Viral On Social Media, Virat kohli