Home /News /sport /

IND vs SA : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूची शार्दूल ठाकुरवर टीका! म्हणाला, तो...

IND vs SA : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूची शार्दूल ठाकुरवर टीका! म्हणाला, तो...

सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडिया 5 बॉलर्ससह मैदानात उतरली आहे. मुंबईकर शार्दुल ठाकुरला (Shardul Thakur) ऑल राऊंडर म्हणून खेळवण्यात आले आहे. त्याच्या कामगिरीवर माजी क्रिकेटपटूनं नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई, 29 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट सेंच्युरियनमध्ये होत आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 327 रन काढले. त्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग 197 रनवर संपुष्टात आली. भारतीय टीमला पहिल्या इनिंगमध्ये 130 रनची आघाडी मिळाली. सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडिया 5 बॉलर्ससह मैदानात उतरली आहे. मुंबईकर शार्दुल ठाकुरला (Shardul Thakur) ऑल राऊंडर म्हणून खेळवण्यात आले आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Aakash Chopra) शार्दुल ठाकुरच्या बॉलिंगवर प्रश्न उपस्थित केला आहे. 'स्टार स्पोर्ट्स' वर कॉमेंट्री करताना आकाश म्हणाला, 'शार्दुल ठाकूर एक फास्ट बॉलर म्हणून खेळत आहे. पण, तो टॉप 5 फास्ट बॉलरपैकी नाही. या मॅचमध्ये खेळणारे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांच्यानंतर उमेश यादव आणि इशांत शर्मा यांचा नंबर येईल. त्यांनी शार्दुलचा ऑल राऊंडर म्हणून समावेश केला आहे. त्यामुळे बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये शार्दुलला चांगली कामगिरी करावी लागेल.' शार्दुल सेंच्युरियन टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये फक्त 4 रन काढून आऊट झाला. त्यानंतर त्यानं बॉलिंगमध्ये त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करत 2 विकेट्स घेतल्या. शार्दुलच्या टेस्ट करियरचा विचार केला तर त्याने सेंच्युरियनमधील मॅचपूर्वी 4 टेस्टमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच 3 अर्धशतकांच्या मदतीनं 190 रन केले असून त्याची बॅटींगमधील सरासरी 38 आहे. IND vs SA : वडिलांच्या आठवणीने मोहम्मद शमी भावुक, क्रिकेटपटूनं सांगितली संघर्षाची गोष्ट! VIDEO शार्दुलनं फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीत 66 मॅचमधील 117 इनिंगमध्ये 28 च्या सरासरीनं 221 विकेट्स घेतल्या आहेत. 31 रन देत 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसंच त्यानं 9 अर्धशतकासह 1444 रन केले आहेत. शार्दुल एकूण टी20 कारकिर्दीमध्ये 145 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Shardul Thakur, South africa, Team india

    पुढील बातम्या