मुंबई, 14 ऑक्टोबर : भारत-पाकिस्तानमध्ये होणारी वर्ल्ड कपची क्रिकेट मॅच असो, अथवा एखाद्या सीरिजमधील मॅच, क्रिकेटप्रेमी मोठ्या आतुरतेनं या दोन्ही टीममध्ये होणाऱ्या मॅचची वाट पाहत असतात. या सर्व क्रिकेट फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. 2023-2027 या काळासाठी बीसीसीआयनं फ्युचर टूर प्रोग्रॅम (एफटीपी) तयार केला असून, तो स्टेट असोसिएशनला पाठवला आहे. मात्र, यामध्ये पाकिस्तान टीमसमोरील कॉलम रिकामा ठेवण्यात आलाय. याचाच अर्थ भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढील पाच वर्षं एकही सीरीज होणार नाही. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून या दोन्ही टीममध्ये एकही द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. त्यातच बीसीसीआयच्या 2023-2027 साठी तयार करण्यात आलेल्या फ्युचर टूर प्रोग्रॅमनुसार पुढील पाच वर्षं तरी भारत-पाकिस्तान या दोन्ही टीममध्ये द्विपक्षीय सीरिज होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पुढील पाच वर्षांत भारतीय टीम ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध जास्त मॅच खेळणार आहे. काय आहे वेळापत्रक? ‘एफटीपी’मध्ये दरवर्षी होणाऱ्या टेस्ट, वन-डे आणि टी-20 सीरिजचं वेळापत्रक असतं. त्यानुसार, भारतीय क्रिकेट टीम पुढील पाच वर्षांत (2023-2027) आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 38 टेस्ट (20 मायदेशी, 18 परदेशात), 42 वन-डे (21 मायदेशी, 21 परदेशात), 61 टी-20 (31 मायदेशी, 30 परदेशी) मॅच खेळणार आहे. यातील एकही मॅच पाकिस्तान टीमविरुद्ध होणार नाही. भारत सरकारची परवानगी मिळेपर्यंत बीसीसीआय पाकिस्तानसोबत द्विपक्षीय सीरिज खेळण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. पाकिस्तानला हरवून 14 वर्षांनी फायनलमध्ये, मॅचनंतर मैदानातच श्रीलंकन महिलांचा Victory Dance यंदा जाहीर करण्यात आलेल्या एफटीपीनुसार द्विपक्षीय सीरिजअंतर्गत भारतीय टीम मागील एफटीपीपेक्षा कमी मॅच खेळेल. टीम इंडियाने शेवटच्या एफटीपी मध्ये द्विपक्षीय सीरिजअंतर्गत 163 मॅच खेळल्या होत्या. तर 2023-2027 च्या एफटीपीमध्ये भारतीय टीमला 141 मॅच खेळायच्या आहेत. या मॅच कमी होण्याचं कारण म्हणजे दरवर्षी होणारे आयसीसी इव्हेंट्स, इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि प्रत्येक सीझनमध्ये 75 ते 80 दिवसांची वाढत असणारी विंडो हे आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ‘मॅचची संख्या कमी झाली असली तरी गुणवत्ताही वाढवण्यात आली आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध अधिक मॅच खेळणार आहे. दोन्ही टीमविरुद्ध दर दोन वर्षांनी 5 टेस्टची सीरिज खेळवली जाईल. यातील एक देशांतर्गत आणि एक प्रतिस्पर्धी टीमच्या देशात असेल.’ यापूर्वी कधी झाली सीरिज? भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट टीममध्ये जवळपास 10 वर्षांपासून कोणतीही द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. पाकिस्तान टीमनं भारताचा दौरा या आधी 2012-13 मध्ये केला होता. तेव्हा दोन्ही टीममध्ये तीन वन-डे आणि दोन टी-20 मॅचची सीरिज झाली. पाकिस्तान टीमनं वन-डे सीरिज 2-1 अशी जिंकली होती, तर टी-20 सीरिज 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. वर्ल्ड कपच्या मैदानात हिटमॅनचा ‘शो’, मोडणार धोनीचा 6 वर्षांपूर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड दरम्यान, बीसीसीआयच्या नव्या फ्युचर टूर प्रोग्रॅम नुसार भारत-पाकिस्तान या दोघांमध्ये द्विपक्षीय सीरिज होणार नसली, तरीही या दोघांमध्ये येत्या 23 ऑक्टोबरला वर्ल्ड कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत मॅच होणार आहे. हा महामुकाबला जिंकून भारतीय टीम चाहत्यांना दिवाळी भेट देणार का, हे लवकरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.