जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: 659 विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सची टीम इंडियात निवड नाही, VIDEO शेअर करत साधला निवड समितीवर निशाणा

IND vs NZ: 659 विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सची टीम इंडियात निवड नाही, VIDEO शेअर करत साधला निवड समितीवर निशाणा

IND vs NZ: 659 विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सची टीम इंडियात निवड नाही, VIDEO शेअर करत साधला निवड समितीवर निशाणा

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील 3 टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजसाठी निवड न झालेल्या सिनिअर खेळाडूनं व्हिडीओ शेअर करत निवड समितीवर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील 3 टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही टीममध्ये अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसंच काही नवे चेहरे देखील आहेत. आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि आवेश खान यांची पहिल्यांदाच टी20 टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यरला टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या दोन्ही टीममध्ये सौराष्ट्राचा कॅप्टन जयदेव उनाडकत (Jaydev Unadkat) याची निवड करण्यात आलेली नाही. उनाडकत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. या निर्णयावर नाराज झालेल्या उनाडकतनं एक व्हिडीओ शेअर करत या निर्णयावर निशाणा साधला आहे. उनाडकतनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी  (Syed Mustaq Ali T20 Tournament 2021) स्पर्धेतील आक्रमक खेळीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘आणखी एक फास्ट बॉलर ज्याला बॅटींग करता येते’ असं कॅप्शन त्यानं या व्हिडीओला दिलं आहे. उनाडकतनं मागच्या आठवड्यात हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये 32 बॉलमध्ये 58 रन काढले होते. या आक्रमक खेळीत त्यानं टीम इंडियाचा बॉलर मोहम्मद सिराजची चांगलीच धुलाई केली होती.

जाहिरात

हा व्हिडीओ पाहून क्रिकेट फॅन्स उनाडकतची तुलना हार्दिक पांड्याशी करत आहेत. हार्दिकचा फिटनेस गेल्या वर्षभरापासून खालवला आहे. त्यामुळे निवड समिती फास्ट बॉलिंग करू शकणाऱ्या ऑल राऊंडरच्या शोधात आहे. या आयपीएल सिझनमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरची टीम इंडियात निवड झाली आहे. पण, त्याच्यापेक्षा सिनिअर आणि अनुभवी उनाडकतकडं दुर्लक्ष केलं करण्यात आलं आहे. उनाडकतचा रेकॉर्ड जयदेव उनाडकतनं 2010 साली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने सात वन-डे आणि 10 टी 20 मॅचमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचा 2018 नंतर टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. उनाडकतचा फर्स्ट क्लास आणि टी 20 क्रिकेटमध्ये जबरदस्त रेकॉर्ड आहे. भारत-पाकिस्तान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने, पाहा कधी आणि कुठे होणार ‘हा’ सामना त्याने 89 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 327 तर 150 टी 20 मॅचमध्ये 182 विकेट्स घेतल्या आहेत. 2019-20 च्या रणजी सिझनमध्ये त्याने 67 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये  सौराष्ट्रच्या रणजी विजेतेपदाचा तो शिल्पकार होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात