मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: टीम इंडियाच्या 3 दिग्गजांवर एकटा जो रूट भारी, पाहा 2021 ची आकडेवारी

IND vs ENG: टीम इंडियाच्या 3 दिग्गजांवर एकटा जो रूट भारी, पाहा 2021 ची आकडेवारी

भारत दौऱ्यात झालेल्या मोठ्या पराभवानंतर इंग्लंडमध्येही जो रूटची (Joe Root) सध्या पिछाडीवर आहे. या टीमच्या निराशाजनक कामगिरीत कॅप्टन जो रूटनं उठावदार कामगिरी केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 ऑगस्ट: भारत दौऱ्यात झालेल्या मोठ्या पराभवानंतर इंग्लंडमध्येही जो रूटची (Joe Root) सध्या पिछाडीवर आहे. या टीमच्या निराशाजनक कामगिरीत कॅप्टन जो रूटनं उठावदार कामगिरी केली आहे. एक कॅप्टन म्हणून रूटसाठी हे वर्ष निराशाजनक असलं तरी बॅट्समन म्हणून तो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. टीम इंडियाच्या बॅटींगचा कणा असलेल्या तीन बॅट्समनच्या एकत्रित रनपेक्षा जास्त रन जो रूटनं केले आहेत.

टीम इंडियाचा कॅप्टन असलेल्या विराट कोहलीनं (Virat Kohli) 2021 मध्ये जो रुटच्या एक चतुर्थांश रन देखील बनवलेले नाहीत. 70 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा विराट कोहलीनं गेल्या 21 महिन्यांपासून एकही शतक झळकालं नाही. तर जो रूटने मागील 7 महिन्यात 5 शतक झळकावले आहेत.

विराट कोहलीच नाही तर टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा देखील सध्या खराब फॉर्मात आहेत. पुजारानं रुटच्या एक तृतीयांश रन केले आहेत. तर रहाणेची कामगिरी आणखी निराशानजक आहे.  टीम इंडियाच्या 3 सिनिअर खेळाडूंनी या वर्षात एकत्र मिळून 1055 रन केले आहेत. जे जो रूटच्या एकूण रनपेक्षा 222 नं कमी आहेत.

जो रूट हा 2021 मध्ये टेस्ट मॅचमध्ये सर्वात जास्त रन करणारा बॅट्समन आहे. त्यानं 10 टेस्ट मॅचमध्ये 67.21 च्या सरासरीनं 1277 रन काढले आहेत. यामध्ये 5 शतकांचा समावेश असून त्यानं भारताविरुद्ध एक द्विशतक देखील झळकावलं आहे. लॉर्ड्सवर मागील आठवड्यात झालेल्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये तो नॉट आऊट होता. त्याचा हा फॉर्म या सीरिजमध्ये टीम इंडियासाठी डोकेदुखी बनलाय.

IND vs ENG: मी जो रूट असतो तर.... सुनील गावसकरांनी दिला इंग्लंडच्या टीमला सल्ला

विराट कोहलीनं यावर्षी 7 तर पुजारा आणि रहाणेनं प्रत्येकी 9 टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी पुजारानं 28.93 च्या सरासरीनं 434 रन केले आहेत. रहाणे आणि कोहलीला तर 400 रनचा टप्पा देखील ओलांडता आलेला नाही. रहाणेनं 22.00 च्या सरासरीनं 330 रन काढले आहेत. तर कोहलीनं 26.45 च्या सरासरीनं 291 रन केले आहेत. कोहली आणि पुजाराला यावर्षी एकही शतक झळकावता आलेलं नसून रहाणेच्या नावावर एक शतक आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Joe root, Virat kohli